शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची उघडीप, मात्र पुराचे पाणी संथगतीने ओसरू लागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 17:35 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी एक-दोन सरी वगळता पावसाची पूर्णत: उघडीप राहिली. आठ-दहा दिवसांनंतर सकाळी आणि दुपारनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. राधानगरी धरणातील विसर्ग कायम असून वारणा व दूधगंगेचा विसर्ग कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुराचे पाणी संथगतीने ओसरू लागले आहे. पंचगंगेची पातळी सायंकाळी पाचपर्यंत केवळ एका इंचाने कमी झाली असून ती ४१.२ फुटांवर आहे.

ठळक मुद्देपावसाची उघडीप, मात्र पुराचे पाणी संथगतीने ओसरू लागलेराधानगरीचा विसर्ग कायम : वारणा, दूधगंगेचा कमी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी एक-दोन सरी वगळता पावसाची पूर्णत: उघडीप राहिली. आठ-दहा दिवसांनंतर सकाळी आणि दुपारनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. राधानगरी धरणातील विसर्ग कायम असून वारणा व दूधगंगेचा विसर्ग कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतली असली तरी पुराचे पाणी संथगतीने ओसरू लागले आहे. पंचगंगेची पातळी सायंकाळी पाचपर्यंत केवळ एका इंचाने कमी झाली असून ती ४१.२ फुटांवर आहे.चार-पाच दिवस धुवादार पावसानंतर मंगळवार (दि. १८)पासून पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मंगळवारी रात्री काही तालुक्यांत जोरदार सरी कोसळल्या. मात्र बुधवारी सकाळी आठ-दहा दिवसांनंतर सूर्यनारायणाने दर्शन दिले. दिवसभरात अधूनमधून हलक्या सरी कोसळल्या. मात्र दुपारनंतर पुन्हा ऊन पडले. एकूणच पावसाचा जोर ओसरला असून, पुराचे पाणीही संथ गतीने का होईना, कमी होऊ लागले आहे.दरम्यान, बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २५.९३ मिलिमीटर पाऊस झाला असून, सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६९.५० मिलिमीटर झाला. अद्याप ७७ बंधारे पाण्याखाली असून ३८ मालमत्तांची पडझड होऊन १२ लाख ९३ हजारांचे नुकसान झाले आहे.ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात धुवादार पावसाने दोन दिवसांत महापूर आणला होता. त्यानंतर गेले चार-पाच दिवस जोरदार पाऊस झाला आणि पुन्हा पूर आल्याने कोल्हापूरकर चांगलेच धास्तावले होते. मात्र दोन्ही वेळेला महापुराचे संकट येणार तोपर्यंत पावसाने उघडीप दिली.धरणांचा पाणीसाठा टीएमसीमध्ये -राधानगरी (८.२८), तुळशी ( ३.३१), वारणा (३१.६२), दूधगंगा (२३.५३), कासारी (२.३६), कडवी ( २.५२), कुंभी (२.४५), पाटगाव (३.७२). 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर