शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
3
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
4
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
5
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
6
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
7
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
8
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
9
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
10
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
11
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
12
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
13
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
14
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
15
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
16
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
17
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
18
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?
19
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

पावसाची उसंत, तरीही पंचगंगेच्या पातळीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 15:47 IST

कोल्हापूर जिल्'ासह शहरात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दिवसभरात एक फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी व कुंभी धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाण्याला फुग आली आहे. ३१ बंधारे पाण्याखाली असून या मार्गांवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.

ठळक मुद्देपावसाची उसंत, तरीही पंचगंगेच्या पातळीत वाढकुंभी धरणातून विसर्ग वाढला : ३१ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्'ासह शहरात पावसाने काहीशी उसंत घेतली असली तरी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. दिवसभरात एक फुटाने पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने राधानगरी व कुंभी धरणांतून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाण्याला फुग आली आहे. ३१ बंधारे पाण्याखाली असून या मार्गांवरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.दोन दिवसांच्या तुलनेत जिल्'ात पावसाचा जोर काहीसा ओसरला. अधूनमधून जोरदार सरी कोसळत असल्या तरी त्यांत तितकासा जोर नाही. गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळ्यात दमदार पाऊस सुरू आहे. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्'ात ४२३.५४ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक ७९.५० मिलिमीटर गगनबावडा तालुक्यात झाला. धरणक्षेत्रांतही जोरदार पाऊस सुरू असून पाणीपातळीत वाढ होत आहे.

राधानगरी धरणातून प्रतिसेकंद १४००, तर कासारीतून ६००, कडवीतून १६० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कुंभी धरणातून ३०० घनफूट विसर्ग सुरू असल्याने कुंभी, भोगावतीच्या पाण्याला फुग आहे.

सकाळी आठ वाजता पंचगंगेची पाणीपातळी ३२.१० फूट, तर सायंकाळी सहा वाजता ३३.८ फुटांवर राहिली. जिल्'ातील विविध नद्यांवरील ३१ बंधारे पाण्याखाली गेले असून, या मार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.पावणेचार लाखांचे नुकसानजिल्'ात पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. अकरा सार्वजनिक मालमत्तांची पडझड होऊन तीन लाख ६७ हजारांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.वारणा धरण ७५ टक्के भरलेगेले तीन-चार दिवस धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. राधानगरी ८५ टक्के , तुळशी ६७ टक्के, तर वारणा ७५ टक्के भरले आहे. दूधगंगा अद्याप ५२ टक्क्यांवरच आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर