शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

पावसाची दडी; खरिपाने मान टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, वरुणराजा हुलकावणी देत असल्याने चिंंता वाढली आहे.यंदा मान्सूनने वेळेत व चांगली सुरुवात केल्याने खरीप पिकांची उगवण चांगली राहिली. जूनमध्ये पावसाला ताकद लागली नसली तरी जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांची वाढ जोमात झाली. उर्वरित दोन-अडीच महिन्यांत चांगला पाऊस होईल, असे अपेक्षित होते. आॅगस्ट उजाडला आणि पावसाने दडी मारली. पहिले दोन-तीन दिवस अधूनमधून का असेना पण सरी कोसळत होत्या; पण गेले आठ-दहा दिवस पावसाने अक्षरश: पाठ फिरविल्याने पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील भात, नागली व भुईमूग ही पिके करपू लागल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. गेले दोन महिने मशागत व महागडी खते घालून पोटच्या पोरासारखे सांभाळलेली पिके डोळ्यांदेखत करपू लागली आहेत.आज पाऊस येईल, उद्या येईल, या आशेवर शेतकरी आहे. दिवसभर आकाशात ढग गोळा होतात; पण पाऊस हुलकावणी देत असल्याने चिंता वाढली आहे. हाता-तोंडाला आलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.नदी, विहिरीत पाणी; पण वीज गायबपावसाळ्यात साधारणपणे सप्टेंबरपर्यंत नदी व विहिरीवरील विद्युत पंपांचा वीजपुरवठा बंद असतो. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापासून पाऊस ओढ धरत असल्याने त्यानंतरच पिकांना पाण्याची गरज भासते; पण यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. नदी, विहिरीत पाणी आहे; पण काही ठिकाणी वीज नसल्याने पिके करपू लागली आहेत.दोन वर्षांपूर्वीची आठवण!दोन वर्षांपूर्वी पावसाने अशीच हुलकावणी दिली होती. जोमात वाढ होण्याच्या वेळेलाच पाऊस गायब झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासारखा अनुभव यंदा शेतकºयांना येऊ लागला आहे.पोषक हवामानामुळे किडींचे आक्रमणकिडीला पोषक असेच हवामान असल्याने सर्व पिकांवर विविध कीडरोगांनी आक्रमण सुरू केले आहे. सोयाबीनवर पाने खाणारी अळी, भाजीपाला व भुईमुगावर पांढºया माशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव, तर भातावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत आहे.‘आॅक्टोबर हिट’चा अनुभवपावसाने दडी मारलीच, पण तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याने अंग करपू लागते. रविवारी दिवसभर सरासरी २८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. उद्या, मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याचा आहे.तुलनात्मक पाऊस (मि.मी.), कंसात टक्केतालुका १३ आॅगस्ट २०१६ १३ आॅगस्ट २०१७हातकणंगले ४८१ (५९) २२७ (२७)शिरोळ ४५५ (११८) १४९ (३८)पन्हाळा १४६२ (१०३) ८३० (५८)शाहूवाडी १९१९ (१२४) १२३० (७९)राधानगरी १५०१ (४२) ११४१ (३२)गगनबावडा ३१७०(५६) २१११ (३७)करवीर ८६१ (१०८) ४०८(५१)कागल ९८३ (१५१) ५२० (८०)गडहिंग्लज ६८६(८७) ३३७ (४३)भुदरगड ११२६ (८३) ७९४ (५९)आजरा १५०३ (८४) ९४५ (५२)चंदगड १४८१ (५६) ११७७ (४५)एकूण १३०२ (७३) ८२२ (४६)