रविवारी पहाटेपासून बेळगाव आणि परिसरात जोराचे वारे वाहू लागले होते. थोड्या वेळाने पावसाला प्रारंभ झाला. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सकाळी सहा ते दहा ही वेळ जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी देण्यात आली आहे; पण या वेळेतही पाऊस सुरूच असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी लोक फिरकले नाहीत. अचानक आलेल्या पावसामुळे रस्त्यावर बसून भाजीविक्रेत्यांना आसरा शोधावा लागला. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. जोराच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडून रस्ते बंद झाले होते. अनेक ठिकाणी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे उडून गेले. काही भागांतील विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. खणगाव खुर्द गावात सकाळी वादळामुळे घरावरील पत्रे पडून नुकसान झाले .सकाळी सहा वाजता ही घटना घडल्याने घरातील लोकांत एकच गोंधळ उडाला. पत्रे पडल्यामुळे विजेचे खांबही कोसळले.
बेळगाव जिल्ह्यात दिवसभर पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:24 IST