शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाच्या हलक्या सरी, रब्बीला दिलासा

By राजाराम लोंढे | Updated: November 28, 2023 15:57 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, मंगळवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. साधारणता पंधरा मिनिटे एक सारख्या सरी कोसळत होत्या. ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, मंगळवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. साधारणता पंधरा मिनिटे एक सारख्या सरी कोसळत होत्या. ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने खोळंबलेल्या रब्बी पेरणीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.यंदा, मान्सूनमध्येही पाऊस नाही आणि परतीचाही नाही. त्यामुळे पाणीदार जिल्ह्यात आतापासूनच नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहे. याची झळ जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्याला सोसावी लागणार आहे. गेली तीन-चार दिवस मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. उभी पिके आडवी केली आहेत, पण कोल्हापुरात केवळ ढगाळ वातावरण राहिले. आज, मंगळवारी सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात दुपारनंतर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे दिवसभरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र कोल्हापूर शहरात दुपारी नुसता शिडकावा झाला. त्यानंतर तीन वाजता जोरदार सरी कोसळल्याने हवामानात गारवा निर्माण झाला.सध्या पावसाची गरज असून जमीनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे खरीप काढल्यानंतर शिवार मोकळी पडली आहेत. जमीनीत पाणी नसल्या विहीरांनाही पाणी कमी पडू लागले आहे. अशा परिस्थिती एक-दोन जोरदार पावसाची गरज आहे. गेल्या दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र मंगळवारी हलका पाऊसच झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस