शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात वळीव पावसाची हजेरी, रेठरे येथील शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू

By संदीप आडनाईक | Updated: April 7, 2023 18:39 IST

उष्णतेमुळे हैराण झालेले नागरिक वातावरणात गारवा पडल्याने सुखावले

कोल्हापूर : गेल्या काही दिवसापासून कमाल तापमानात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी वळीव पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह अंधारुन आल्यामुळे पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. महावेधच्या रडारनुसार राधानगरी तालुक्यात आणि कुंभी धरण परिसरात पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. दरम्यान, शाहूवाडी तालुक्यातील मौजे रेठरे येथील बाबुराब दादू जाधव (वय ६१) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला. तर आजऱ्यात एक महिला जखमी झाली.करवीर, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यात बऱ्यापैकी पाऊस झाला. राधानगरी तालुक्यात सर्वाधिक ठिकाणी पाउस पडल्याची नोंद आहे.जिल्ह्यात आज दिवसभर उष्ण वातावरणामुळे उष्णतेच्या झळा लागल्या होत्या. दिवसभर ३४ हून अधिक डिग्री सेल्सिअस तापमान राहिले. ढगाळ वातावरणातही सहन न होणारा उकाडा जाणवत राहिला. अचानक पडलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाने पुढील दोन दिवसात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.गडहिंग्लज परिसरात सकाळीच पावसाने हजेरी लावली होती. करवीर तालुक्यातील म्हालसवडे परिसरात विजांचा कडकडाट होउन पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बच्चेकंपनींनी या पावसाचा पुरेपूर आनंद लुटला. भुदरगड तालुक्यात गारगोटीसह आदमापूर, मुदाळतिट्टा आणि बिद्री परिसरात विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने हजेरी लावली.आजरा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. आठवडा बाजारादिवशी पावसाने हजेरी लावल्याने ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली. राधानगरी तालुक्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. कसबा तारळे परिसरात हलका पाऊस झाला. उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिक वातावरणात गारवा पडल्याने सुखावले.जोतिबावरील पावसाचे खोटे व्हिडिओ व्हायरलजोतिबाची चैत्री यात्रा बुधवारी पार पडली. डोंगरावर पडलेला गुलाल धुण्यासाठी पाउस पडल्याचे खोटे व्हिडिओ व्हायरल झाले. मात्र हे व्हिडिओ आज, शुक्रवारी पडलेल्या पावसाचे नव्हते. यापूर्वीच्या पावसाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला.

  • शाहुवाडी : कडवी : ( १० मिमि)
  • राधानगरी : भागोजी पाटीलवाडी :( ४), पडसाळी : (११), पडळी : (६), दूधगंगानगर : (१२), सरवडे : (१९), वाकी : (१४), हसणे : (१३)
  • गगनबावडा : गगनबावडा (१), मांडुकली (३), रेवाची वाडी (१०) कुंभी धरण (२१)
टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस