शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, दिवसभर उघडझाप : नद्यांच्या पातळीत मात्र वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:47 IST

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार कोसळणाऱ्या सरी मात्र पाणीच पाणी करीत होत्या. गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत मात्र पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झालेली दिसते.

ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलादिवसभर उघडझाप : नद्यांच्या पातळीत मात्र वाढ

कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार कोसळणाऱ्या सरी मात्र पाणीच पाणी करीत होत्या. गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत मात्र पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झालेली दिसते.गेले दोन दिवस पावसाने जिल्ह्याला अक्षरश: झोडपून काढले होते. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर राहिल्याने आणखी दोन-तीन दिवस असाच पाऊस राहिला तर नद्यांना पूर येण्याची शक्यता होती; पण बुधवारी सकाळपासून पावसाचा जोर काहीसा ओसरला.

सकाळी सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने पाऊस एकदमच थांबला. दिवसभर ऊन-पावसाचा खेळ सुरूच राहिला. अधूनमधून सरी कोसळल्या, तरी सगळीकडे पाणीच पाणी झाले.धरणक्षेत्रात मात्र चांगला पाऊस सुरू असून, तुळशी धरणाचा अपवाद वगळता बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत सर्वच धरणांच्या कार्यक्षेत्रांत अतिवृष्टी झाली. सर्वाधिक २०० मिलिमीटर पाऊस कासारी धरणक्षेत्रात झाला.

गगनबावडा तालुक्यातही सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली असून चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यांत पावसाची रिपरिप कायम राहिली. कोल्हापूर शहरात दिवसभर उघडझाप राहिली. जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेले असून पंचगंगेची पातळी २३ फुटांपेक्षा अधिक झाली आहे.तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये असा-हातकणंगले (२.९४), शिरोळ (१.४२), पन्हाळा (१२.४२), शाहूवाडी (३२.००), राधानगरी (३७.८३), गगनबावडा ( ९३.५०), करवीर (१०.१८), कागल (२०.४२), गडहिंग्लज (१४.००), भुदरगड (५४.००), आजरा (३३.७५), चंदगड (६४.१६).

 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018kolhapurकोल्हापूर