शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे फाटक पादचाऱ्यांसाठी बंद, नागरिकांच्यामधून नाराजी; परीख पुलाखालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:46 IST

रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख पुलाखालून ये - जा करावी लागणार आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नारजी व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने उचलले पाऊल रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून केला मार्गच बंद

कोल्हापूर : रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख पुलाखालून ये - जा करावी लागणार आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नारजी व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्याच आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह परिसराची पाहणी केली होती. मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक या ठिकाणी घडणाऱ्या वारंवार होणाऱ्या दुर्घटना पाहता रेल्वे रूळ पादचाऱ्यांसाठी बंद करण्याचा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून हा मार्गच बंद केला आहे.

राजारामुपरी मार्ग मध्यवर्ती बसस्थानकाकडे व मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी व शाहुपूरीकडे येण्यासाठी रेल्वे फाटक हा पादचार्यांसाठी जवळचा मार्ग होता. या मार्गावरून दररोज अनेक नागरिक ये - जा करत होते. आता हा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना बाबूभाई परिघ पूलांच्या खालून प्रवास करावा लागणार आहे. परीघ फूल अधिच अरुंद आहे. त्यामध्ये आता वाहनधारक व पदाचारी एकाच वेळी ये - जा करत असल्याने वाहतूकींची मोठी कोंडी होत आहे.

 

रेल्वे रुळावरून पदचार्यांनी प्रवास करू नये अशा वारंवार सूचना देवून सुध्दा प्रवासी येथून ये - जा करत असल्याने ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने कर्मचाऱ्यांवर तणाव येत आहे. येथील वाहतूक बंद करावी अशा सूचना वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत आल्यानेच ही शुक्रवार पासून ही वाहतूक बंद केली आहे.- विजयकुमार(रेल्वेस्थानक) प्रबंधक

वादाचे प्रसंग....रेल्वे प्रशासनाने वाहतूक बंद केल्याने पादचारी यांना आता परीघ पुलाखालून प्रवास करावा लागतो, या ठिकाणी नेहमी ड्रेनेज पाणी येत असल्याने वाहनाचे पाणी येथून ये - जा करणाऱ्या पादचारी यांच्या अंगावर उडत असल्याने वादाचे प्रसंग घडत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पादचारी पूल बांधवा पण त्यापूर्वी परीघ पूलाखालील ड्रेनेज पाईप लाईने काम तात्काळ करावे, अशी मागणी प्रवाशांच्यामधून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndian Railwayभारतीय रेल्वे