शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

Lok sabha 2024: राहुल आवाडे हातकणंगले मतदारसंघातून हातात घेणार ‘मशाल’; दोन दिवसांत ‘मातोश्री’वर जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 13:14 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची मशाल हातात घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल आवाडे हे हातकणंगलेलोकसभा मतदारसंघातून शिवसेनेची मशाल हातात घेण्याच्या तयारीत आहेत. येत्या दोन दिवसांत ते ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. गुरुवारी कोल्हापुरात झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत तसा निर्णय झाला. आमदार प्रकाश आवाडे यांच्या उपस्थितीतच ही बैठक झाली. त्यामुळे हातकणंगले मतदारसंघात तिरंगी लढतीची शक्यता बळावली आहे.गेल्या दोन निवडणुकांपासून आपण तयारी करतोय; पण, प्रत्येकवेळी वरिष्ठांकडून थांबवले जाते. किती दिवस दुसऱ्यांच्या विजयासाठी राबायचे? आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, राहुल आवाडे यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, अशी चर्चा बैठकीत करण्यात आली. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ही जागा लढवायची ठरविली तर प्रसंगी त्यांची मशाल हातात घ्या; पण, निवडणूक लढवा, असा दबावच पदाधिकाऱ्यांनी आवाडे यांच्यावर आणला.कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार लक्षात घेत येत्या दोन दिवसांत (शनिवारपर्यंत) वरिष्ठांशी चर्चा करून पुढील भूमिका जाहीर करू, असा शब्द आमदार आवाडे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू असतानाच शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय पवार यांनी आमदार आवाडे यांची भेट घेतल्याने खळबळ उडाली.

आवाडे-पवार यांच्यात चर्चाशिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख संजय पवार आल्यानंतर आमदार आवाडे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून बाहेर येत त्यांच्याशी पंधरा ते वीस मिनिटे बंद खोलीत चर्चा केली.

कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवा, असा कार्यकर्त्यांचा दबाव आहे. मलाही ही शेवटची संधी आहे. त्यामुळे आता माघार नाही, निवडणूक लढवणारच. - राहुल आवाडे, इच्छुक उमेदवार

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाhatkanangle-acहातकणंगलेShiv Senaशिवसेना