शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

Maharashtra Vidhan Sabha 2019 : राफेलचे शस्त्रपूजन भारतीय संस्कृतीनुसारच : प्रमोद सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:07 IST

राफेलचे शस्त्रपूजन हे भारतीय संस्कृतीनुसारच केले असल्याचे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची बाजू घेतली. ​​​​​​​

ठळक मुद्देराफेलचे शस्त्रपूजन भारतीय संस्कृतीनुसारच : प्रमोद सावंतभाजपतर्फे ‘कॉफी विथ यूथ’ उपक्रमाअंतर्गत तरुणाईशी संवाद

कोल्हापूर : राफेलचे शस्त्रपूजन हे भारतीय संस्कृतीनुसारच केले असल्याचे सांगून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची बाजू घेतली.भाजपतर्फे आयोजित ‘कॉफी विथ यूथ’ या उपक्रमाअंतर्गत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आज, गुरुवारी कोल्हापुरात आले होते. शिवाजी विद्यापीठाच्या मार्गावरील राम मंगल कार्यालयात सकाळी सावंत यांनी तरुणाईशी संवाद साधला. तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राफेलचे पूजन करणे यात अंधश्रध्दा नाही. दसऱ्याला शस्त्रपूजन करणे ही भारतीय संस्कृतीच आहे, त्यामुळे यावर टीका करणे चुकीचे आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चांगले सरकार दिले आहे. महाराष्ट्रातही देवेंद्र फडणवीस यांनी चांगले काम केले आहे. पहिल्या पाच वर्षातच त्यांनी केलेल्या कामांना आणखीन संधी देणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.मुख्यमंत्री सावंत यांनी कोल्हापुरात शिक्षण घेतले आहे. ‘यूथ आयकॉन’ अशी त्यांची ओळख आहे. तरुणाईला डॉ. सावंत यांच्या जीवनपट जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यामुळे भाजपने ‘कॉफी विथ यूथ’ उपक्रम आयोजित केला आहे. त्याअंतर्गत डॉ. सावंत यांच्याशी तरुणाईने थेट संवाद साधला.यावेळी भाजपचे उमेदवार आमदार अमल महाडिक, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे उपस्थित होते.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूरBJPभाजपा