शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Radhanagari Vidhan Sabha Election Result 2024: राधानगरी मतदारसंघातून शिंदेसेनेच्या प्रकाश आबिटकर यांची निर्णायक आघाडी

By विश्वास पाटील | Updated: November 23, 2024 11:07 IST

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदार संघातून शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे नवव्या फेरीअखेर १०५३३ मतांनी आघाडीवर आहेत. एकूण कल ...

कोल्हापूर : राधानगरी विधानसभा मतदार संघातून शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे नवव्या फेरीअखेर १०५३३ मतांनी आघाडीवर आहेत. एकूण कल पाहता आमदार आबिटकर यांची ही निर्णायक आघाडी मानली जाते.या मतदार संघातून उध्दवसेनेचे माजी आमदार के.पी.पाटील यांनी आबिटकर यांना तगडे आव्हान दिले. कधी नव्हे ती राधानगरी तालुक्यातील काँग्रेस के.पी.पाटील यांच्या मागे एकवटली होती. झाडून सारे मातब्बर नेते त्यांच्यामागे होते. परंतू आमदार आबिटकर सुरुवातीपासूनच नेते कुणाकडेही असले तरी जनता माझ्यासोबत आहे यावर ठाम होते. मतपेटीतून तसेच चित्र पुढे येताना दिसत आहे. आमदार आबिटकर यांनी केलेली विकासकामे, उत्तम संपर्क, तरुणाईला भावणारे व्यक्तिमत्व, सुखदु:खाला धावून येणारा आमदार अशी त्यांची प्रतिमा होती, तिलाच जनतेने मतपेटीतून बळ दिल्याचे दिसत आहे. के.पी.पाटील यांना उशीराने जाहीर झालेली उमेदवारी, त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचण्यात आलेल्या अडचणी, शिवाय तुम्ही बिद्री कारखाना चांगला चालवताय तर त्याकडेच लक्ष द्या असाही मेसेज जनतेने आतापर्यंतच्या निकालावरून दिल्याचे दिसत आहे. या मतदार संघात ए.वाय.पाटील यांनी बंडखोरी केली होती परंतू त्यांचा तसा आबिटकर यांनाही फार फायदा झाल्याचे दिसत नाही. आबिटकर स्वत:च्या ताकदीवरच निकालात पुढे सरकल्याचे दिसत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024radhanagari-acराधानगरीPrakash abitkarप्रकाश आबिटकरShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेK P. Patilके. पी. पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024