शासनाच्या स्टार्टअप आणि स्टँडअप योजनांचा लाभ घेऊन मुख्य प्रवाहात समाजाने यावे. मातंग समाज हा रोजगार करणारा नव्हे तर रोजगार देणारा अशी आपली ओळख निर्माण व्हावी, असे प्रतिपादन उद्योगपती संजय वाघ यांनी केले.
राधानगरी तालुका मातंग समाजाच्या वतीने परिते (ता.करवीर) येथे आयोजित मेळाव्याच्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षपदी संजय वाघ होते.
ते पुढे म्हणाले, मातंग समाज बाराबलुतेदारीचा मुख्य हिस्सा राहिला होता. मात्र, आता या समाजाने बदलत्या प्रवाहाबरोबर बदललं पाहिजे आणि स्वत:च्या वाटा निश्चित केल्या पाहिजेत.
यावेळी प्रा. रवींद्र पाटोळे, दयानंद मेहतर यांचीही भाषणे झाली.
ज्ञानेश पांडुरंग पाटोळे यांना साहित्यातील विशेष योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य शहाजी पवते, ज्ञानदेव चांदणे, भाऊ चांदणे, शामराव शेंडगे, अर्जुन भोरे, प्रकाश साठे, दत्ता पाटोळे, लहू चांदणे, सुंदर चांदणे, संभाजी चौगुले, अभी चौगुले, गणेश खुडे, शिवाजी खुडे, संभाजी पाटोळे, सागर पाटोळे, प्रकाश साठे, दत्ता पाटोळे, अंकुश चांदणे, संभाजी पाटोळे, सुंदर चांदणे, संभाजी चौगुले, अतुल चौगुले, शंकर खुडे, नागेश शेंडगे उपस्थित होते.