शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

राधानगरी मतदारसंघ विकसनशील करणार---माझा अजेंडा...!

By admin | Updated: November 17, 2014 23:27 IST

प्रकाश आबिटकर : प्रशासकीय कार्यालये एका छताखाली आणणार, अपूर्ण लघू प्रकल्पांसाठी प्रयत्नशील-

शिवाजी सावंत = गारगोटी --सह्याद्रीच्या पर्वतरांगेत विसावलेला आणि निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केलेल्या सौंदर्याचा पुरेपूर वापर करून हा मतदारसंघ प्रति महाबळेश्वर बनविण्यासाठी खास प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार प्रकाशराव आबिटकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. आगामी पाच वर्षांत दाजीपूरला जंगलात राहणाऱ्या पुनर्वसन तसेच मतदारसंघातील सर्व अपूर्ण लघू प्रकल्प पूर्णत्वाकडे नेणे, आकुर्डे येथील प्रलंबित असणारी एमआयडीसी, ऐनी, आटेगाव, मिणचे खोऱ्यांतील कालव्यांचे अस्तरीकरण, पाणंद व रस्ते रूंदीकरण, गारगोटी, आजरा, राधानगरी या शहरांचा सुधारित विकास आराखडा, तसेच प्रशासकीय कार्यालये एका छताखाली आणणे, अशा महत्त्वाच्या कामांना अग्रक्रम देऊन मागासलेला मतदारसंघ असा असलेला ठपका पुसून विकसनशील मतदारसंघ करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.मागील काही वर्षांत भरीव अशी विकासकामे न झाल्याने हा मतदारसंघ भकास झाला आहे. यासाठी मी ‘युवा संघर्ष यात्रा’ काढून जनजागृती केली. तरुणांसह सर्व अबालवृद्धांनी गटातटाच्या राजकारणाला छेद देत माझ्यावर विश्वास दाखविला. त्यामुळे माझ्यावरील नैतिक जबाबदारी वाढली आहे. सर्वांच्या सहकार्यातून पुढील पाच वर्षांत या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येईल. मतदारसंघात करण्यासारखे खूप आहे; पण जेवढे शक्य होईल तेवढे करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.मतदारसंघात अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या प्रेक्षणीय स्थळांचा विकास आणि तेथेपर्यंत जाण्यासाठी दळण-वळणाची सोय केल्यास पर्यटक आपोआपच आकर्षित होतील. रांगणा किल्ल्याचा परिसर म्हणजे घाट आणि कोकण यांची नैसर्गिक सीमारेषा आहे. शिवाय तेथील दऱ्या, वातावरण हे प्रति महाबळेश्वर म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याठिकाणी जाण्यासाठी किमान चारचाकी जाण्याइतपत रस्ता झाला, तर पर्यटक, अभ्यासक यांची वर्दळ वाढेल. त्याचबरोबर धामणी, डेळे-चिवाळे, निष्णप, नागनवाडी हे लघू प्रकल्प गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. त्यांच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करणार. शेळोली येथून जलउपसा केंद्र उभारून चिकोत्रा धरणात पाणी नेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापून आराखडा तयार करून घेऊन शासनदरबारी प्रयत्न करणार. ऐनी-आटेगाव, मिणचे खोऱ्यांतील कालव्यांचे अस्तरीकरण आणि बाधित क्षेत्र यांची नुकसानभरपाई यासाठी पाठपुरावा करणार. गेली अनेक वर्षे आकुर्डे या डोंगरावरील एम.आय.डी.सी. कागदावरच आहे. केवळ मंजुरी; पण कार्यवाही नाही. त्यामुळे ती प्रत्यक्षात उभारून हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न करणार आहे. औद्योगिक विकासाशिवाय सर्वांगीण आणि सर्व घटकांचा विकास होणे शक्य नाही. शासकीय रुग्णालये अद्ययावत करून अपघात, अतिदक्षता विभाग सुसज्ज करून पुरेसा औषध पुरवठा करण्यासाठी शासनाकडे आग्रही भूमिका मांडणार आहे. साथीला रोगांचा फैलाव होऊ नये म्हणून राधानगरी, गारगोटी, आजरा या शहरांचा सुधारित आराखडा तयार करून घनकचरा व नाल्यातील दूषित पाण्याच्या नि:स्सारणासाठी प्रभावी उपाययोजना करण्यावर भर देणार आहे.मतदारसंघात ऊस पीक मुख्य आहे. शेतकऱ्यांच्या ऊस पिकासाठी हमीभाव आणि गुऱ्हाळघरांच्या संकटाचा यक्ष प्रश्न आहे. खतांच्या वाढत्या किंमती, मजुरी, अनियमित वीजपुरवठा यामुळे उत्पादन खर्च वाढत आहे. मात्र, त्या पटीत उसाच्या पिकाला हमीभाव मिळत नाही. साखर आणि गुळाच्या दराची अस्थिरता शेतकऱ्यांसह गुऱ्हाळ मालकांना रसातळाला नेत आहे. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे आग्रही भूमिका मांडणार. रस्ते रूंदीकरण व पाणंद अतिक्रमण हा सध्या महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर मुदाळतिट्टा येथे सततची होणारी वाहतुकीची कोंडी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न सोडविण्यासाठी मुदाळ येथे पोलीस ठाणे उभारण्याकरिता प्रयत्न करणार आहे. तसेच पोलीस कर्मचाऱ्यांची निवासस्थाने राहण्यायोग्य नसल्याने ती नव्याने उभारणींसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. गली अनेक वर्षे युवकाच्या माध्यमातून सुरू असलेले बॅँक लिंकेज, राष्ट्रीयकृत बॅँकांकडून अर्थसाहाय्य, फिरता बाजार, दुकाने, महिला उभारत असलेल्या उद्योगाला पतसाहाय्य, ग्रामीण उद्योजकता विकास कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रम यासारखे अनेक उपक्रम अधिक महिलाभिमुख करण्यावर विशेष भर देण्यात येईल. ‘विना सहकार नही उद्धार’ हे ब्रीदवाक्य सत्यात उतरविण्यासाठी आग्रही राहणार असून, सहकाराची पंढरी असणारा भुदरगड तालुका २००० सालापासून पतसंस्थांच्या रूपाने अडचणीत आला आहे. यामध्ये अनेक पतसंस्थांमध्ये हजारो ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले आहेत. हजारो कर्मचारी देशोधडीला लागले आहेत. अशा कर्मचारी व ठेवीदारांसाठी शासनाकडे विशेष मदत मागणार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारून मोफत मार्गदर्शन करण्यासाठीचा कक्ष अद्ययावत करणार. प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्याच्या यादीत नेहमी व असतात विद्यार्थ्यांकरिता प्राथमिक स्तरापासूनच तज्ज्ञाच्या मार्गदर्शनासाठी भर देणार आहे.(उद्याच्या अंकात आमदार हसन मुश्रीफ)होय ! यासाठी आग्रहीएम.आय.डी.सी. : आर्थिक विकासाची जननी असणाऱ्या औद्योगिक वसाहतीसाठी विशेष प्रयत्नप्रकल्प : धामणी, निष्णप, नागनवाडी, डेळे-चिवाळे, लघू प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आग्रही. यामुळे आणखी हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येईल.पर्यटनस्थळे : मौनी महाराज, मुळे महाराज या दोन संजीवनी समाध्या, भुदरगड रांगणा हे दोन किल्ले यांचे संवर्धन व विकसित करणार, यामुळे पर्यटन व्यवसायाला गती येईल.महिला रोजगार : महिलांना बचत गट व स्वयंरोजगाराच्या माध्यमातून छोटेमोठे उद्योग व्यवसाय उभारून रोजगार निर्मिती करणार.जंगलकेंद्रित विकास४सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि जंगलाने व्याप्त असणाऱ्या या मतदारसंघात अनेक वनौषधी व जंगली फळे आहेत. जांभूळ, करवंदे, आंबा, काजू, फणस याशिवाय अनेक फळांची झाडे आहेत. ४फळ येण्याच्या मोसमात सर्वच फळे विपुल प्रमाणात येतात; पण फळ प्रक्रिया उद्योग नसल्याने ती अधिक वाया जातात किंवा खराब होतात. यासाठी तरुण शेतकऱ्यांना फळ प्रक्रिया उद्योग उभारण्याकरिता मार्गदर्शन व शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार, त्याचबरोबर जंगलात अनेक प्रकारची दुर्मीळ वनौषधी वनस्पती आहेत. त्यांचे योग्य संशोधन व औषध निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार आहे.