कोल्हापूर : करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. प्रशांत अमृतकर यांची पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी आर. आर. तथा राजाराम रामराव पाटील यांची नियुक्ती झाली असून, ते लवकरच पदभार स्वीकारणार आहेत.
पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूर पोलीस दलात अर्थिक गुन्हे शाखा, पोलीस कल्याण, शहर वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. जानेवारी २०१७मध्ये त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी पदोन्नती झाली. त्यांनी शाहूवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांची पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलीस आयुक्तपदी बदली झाली होती, तेथेही काही वर्षांचा सेवाकाळ झाल्यानंतर पुन्हा करवीर उपविभागात बदली झाली आहे. अमृतकर यांनी कोल्हापुरातील सेवाकाळात चांगली छाप उमटवली.
(फोटो संग्रहित वापरावा व सांगली, सातारा आवृतीलाही द्यावी)