शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

बाळुमामांच्या मालिकेत दाखवला जाणारा मनोहर भोसलेचा फोटो त्वरीत काढा, अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 15:36 IST

Balumama serial : एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतील मनोहर भोसले याच्या फोटोवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे.

सरवडे :दूरदर्शनवर सुरू असलेल्या एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होणार्‍या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या प्रारंभी मनोहर भोसले याचा दाखवला जाणारा फोटो त्वरित काढा अन्यथा तीव्र आंदोलन उभा करू व मालिका प्रसारण बंद पाडू असा इशारा आदमापूर ग्रामस्थांसह बाळूमामा भक्तांनी दिला आहे. ग्रामपंचायतीच्यावतीने या मागणीचे पत्र निर्माता संतोष आयाचित यांना पाठवले आहे. तर आदमापूरातील बाळूमामा देवालय समितीच्यावतीनेही भोसले याचा निषेध केला आला आहे.

एका मराठी वाहिनीवरून प्रसारित होत असलेल्या ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेतील मनोहर भोसले याच्या फोटोवर ग्रामस्थांनी आक्षेप घेतला आहे. आमचा मालिकेला विरोध नाही; पण प्रारंभी जो भोसले याचा फोटो दाखवला जातो त्याला आमचा विरोध आहे. या फोटोमुळेच भोळीभाबडी भक्तमंडळी त्याच्या आहारी जात आहेत असे दिसते, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

आदमापूर परिसरातील काही गावांमधील सुज्ञ नागरिक यांचा थेट उंदरगावाशी संबंध आला आहे. ज्यावेळी मनोहर भोसले आदमापूर परिसरात आला त्यावेळी त्याच्या गाडीतून काहीजण फिरले आहेत. त्यात काही नेतेमंडळींचा समावेश आहे. यामुळेच त्याने या परिसरात हात-पाय पसरायला सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. भोसलेबाबत भक्तांमध्ये प्रचंड चीड आहे. आता आपली मोठ्या प्रमाणात फसगत झाली असल्याचेही भक्त बोलत आहेत.

बाळूमामा देवालय समितीकडूनही निषेधबाळूमामा यांच्या नावाचा गैरवापर करून आपला आर्थिक लाभ उठवणारा मनोहर भोसले (उंदरगाव) याचा बाळूमामा देवालय समितीने ठरवाद्वारे निषेध केला आहे. या ठरावाला लक्ष्मण पाटील सूचक, तर गोविंद पाटील अनुमोदक आहेत. दरम्यान लवकरच चार दिवसात यासंबंधी सविस्तर खुलासा देणार असल्याचे देवस्थान समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम यांनी सांगितले. 

टॅग्स :Balumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलंkolhapurकोल्हापूर