शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद, नावनोंदणीसाठी त्वरा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 10:58 IST

लाखोंच्या बक्षिसांची लयलूट, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, उत्कृष्ट नियोजन, आदी वैशिष्ट्ये असणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरची नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राची एक नवी ओळख बनली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक आहे.

ठळक मुद्दे ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद, नावनोंदणीसाठी त्वरा करा विविध पाच गटांमध्ये सहभागी होण्याची संधी; नोंदणीची अंतिम मुदत २१ डिसेंबर

कोल्हापूर : लाखोंच्या बक्षिसांची लयलूट, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, उत्कृष्ट नियोजन, आदी वैशिष्ट्ये असणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’कोल्हापूरची नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राची एक नवी ओळख बनली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक आहे.

कोल्हापुरात ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या महामॅरेथॉनच्या तिसऱ्या पर्वासाठी नावनोंदणी सुरू झाली आहे. नावनोंदणीच्या पहिल्या तीन दिवसांत दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी करीत उदंड प्रतिसाद दिला आहे. तरी सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपलाही सहभाग आजच नोंदवून निश्चिंत व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.येथील पोलीस क्रीडांगणातून ५ जानेवारीला पहाटे पाच वाजता या मॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. ही महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यासाठी) १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ वर्षांपेक्षा जास्त) या गटांत होणार आहे.

तीन किलोमीटरची फॅमिली रन आणि पाच किलोमीटर अंतराचा गट असणार आहे. ती रन सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी ‘डिफेन्स’ हा वेगळा गट (२१ किलोमीटर) ठेवण्यात आला आहे. या मॅरेथॉनमधील विविध गटांमधील विजेत्यांना एकूण सहा लाखांची बक्षिसे दिली जाणार आहेत.नावनोंदणीची अंतिम मुदत २१ डिसेंबर आहे. आरोग्यदायी, आनंददायक अनुभव घेण्यासाठी धावपटू, कोल्हापूरकरांनी त्वरित नावनोंदणी करावी. या महामॅरेथॉनच्या सीझन २ ला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्र मॅरेथॉनमय होणार आहे. महामॅरेथॉनच्या सीझन ३ साठी आजच नोंदणी करा.

नावनोंदणीसाठी येथे संपर्क साधामहामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी  वेबसाईटसह लोकमत शहर कार्यालय, कोंडा ओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर; मोबाईल नंबर ९६३७३३०७०० अथवा ९७६७२६४८८५ वर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीची अंतिम मुदत दि. २१ डिसेंबर २०१९ आहे; त्यामुळे नोंदणीसाठी त्वरा करा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

‘लोकमत महामॅरेथॉन’च्या तिसऱ्या पर्वात मीही सलग तिसऱ्या वर्षी सहभागी होत आहे. या महामॅरेथॉनमधून खेळाडूंना प्रोत्साहन व आरोग्यविषयक जनजागृती होत आहे. यातून व्यायामाची सवय आणि त्याचे महत्त्व हा संदेश देण्याचे काम ‘लोकमत’ करीत आहे. यात मी सहभागी झालो असून, तुम्हीही सहभागी होऊन आरोग्यासाठी धावावे.- चंद्रदीप नरके, माजी आमदार, अध्यक्ष, कुंभी-कासारी साखर कारखाना, कुडित्रे.

‘लोकमत महामॅरेथॉन’ हा फिट कोल्हापूरकरांसाठी अतिशय चांगला उपक्रम आहे. मी यात सातत्याने सहकुटुंब सहभागी होऊन धावण्याचा आनंद घेत आहे. तुम्हीही यात सहभागी होऊन धावण्याचा आनंद घ्या. तुम्हीही संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यसमृद्धीसाठी सहभागी होऊन इतरांना प्रवृत्त करा.- उदय पाटील, डबल आयर्नमन

शुल्क कमी, बक्षिसे मोठी

  • प्रकार                                         शुल्क        (अर्ली बर्ड शुल्क)              असे मिळणार साहित्य
  • ३ किलोमीटर (फॅमिली रन)      ४०० रुपये           ४०० रुपये                      टी-शर्ट गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • ५ किलोमीटर (फन रन)           ६०० रुपये            ५०० रुपये                     टी-शर्ट, गुडीबॅग, मेडल, ब्रेकफास्ट
  • १० किलोमीटर (पॉवर रन)       १२०० रुपये       ११०० रुपये                      टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल,                                                                                                                        टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (हाफ मॅरेथॉन) १२०० रुपये          ११०० रुपये                   टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल,                                                                                                              टाईम चिप, ब्रेकफास्ट
  • २१ किलोमीटर (डिफेन्स गट) १००० रुपये             १,००० रुपये                टी-शर्ट, गुडीबॅग, सर्टिफिकेट, मेडल,                                                                                                               टाईम चिप, ब्रेकफास्ट

 

 

 

टॅग्स :Marathonमॅरेथॉनkolhapurकोल्हापूर