कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले महिनाभरापासून ४५ वर्षावरील नागरिकांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु लसीचा कमी पुरवठा असल्याने लसीकरण वारंवार स्थगित करावे लागत आहे. आपल्याला लस मिळेल की नाही या द्विधावस्थेत असणारे नागरिक आता पहाटेपासूनच रांग तयार करत आहेत. अशीच परिस्थिती उदगाव येथे सोमवारी सकाळी दिसून आली. पहाटे सहापासून नागरिकांनी मोठीच्या मोठी रांग केली होती.
कोरोनाचा वाढता कहर काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. त्याला एकच उपाय म्हणून शासनाने जमावबंदी केली आहे. इतर सर्व कामकाजावर बंदी आणली आहे. लसीकरण हा पर्याय नागरिकांसमोर ठेवला आहे परंतु लसीकरण करताना लस संपली म्हणून नागरिकांना परत फिरावे लागत आहे. आपल्याला पुन्हा लस मिळेल की नाही या मन:स्थितीत असलेले नागरिक पहाटेपासून नंबर लावत आहेत. ही गर्दी दोनशेच्या आसपास होती त्यामुळे ह्या गर्दीमुळे कोरोनाची श्यक्यता जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी लागेल.
-----
कोट्
लसीकरणासाठी गावात गर्दी होत आहे. दोनशे ते अडीचशे लोक रांगेत उभे असतात. ह्या गर्दीमुळेच कोरोना पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने जास्त लसीचा पुरवठा करून नागरिकांतील भीती दूर करावी.
रमेश मगदूम, ग्रामपंचायत सदस्य
फोटो ओळ-
उदगाव, ता. शिरोळ येथील टेक्निकल हायस्कूलमध्ये लसीकरणासाठी सकाळी सहापासूनच नागरिकांनी मोठी रांग तयार केली आहे.
छाया- अभिषेक भंडारे,