शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

दर्जेदार समीक्षाग्रंथाचा होणार ‘डॉ. म. सु. पाटील’ पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 10:19 IST

कोल्हापूर : ख्यातनाम समीक्षक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. म. सु. पाटील यांचे कुटुंबीय आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरतर्फे दर ...

ठळक मुद्देदर्जेदार समीक्षाग्रंथाचा होणार ‘डॉ. म. सु. पाटील’ पुरस्काराने सन्मानपाटील कुटुंबीय, शिवाजी विद्यापीठाचा उपक्रम; पाच लाखांचा निधी सुपूर्द

कोल्हापूर : ख्यातनाम समीक्षक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. म. सु. पाटील यांचे कुटुंबीय आणि शिवाजी विद्यापीठकोल्हापूरतर्फे दर दोन वर्षांनी ‘डॉ. म. सु. पाटील पुरस्कार’ हा दर्जेदार समीक्षाग्रंथास दिला जाणार आहे.समीक्षा, वैचारिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

या पुरस्कारासाठी म. सु. पाटील कुटुंबीयांच्या वतीने पाच लाख रुपये विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या देणगी रकमेच्या व्याजातून हा पुरस्कार दिला जाणार आहे.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, म. सु. पाटील कुटुंबातील कवयित्री नीरजा, शंकर अय्यर, तृप्ती शंकर, अनुराधा मोकल, वित्त व लेखा अधिकारी व्ही. टी. पाटील, प्राचार्य कणसे, उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. राजन गवस, रणधीर शिंदे हे उपस्थित होते.

भारतीय साहित्यशास्त्रात महत्त्वम. सु. पाटील हे मराठीतील नामवंत समीक्षक असून, मनमाड (खानदेश) महाविद्यालयात त्यांनी दीर्घकाळ प्राचार्य म्हणून काम केले आहे. त्यांचे आजवर दहाहून अधिक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. मराठी समीक्षा लेखन परंपरेत त्यांनी केलेली समीक्षा मुलभूत स्वरूपाची आहे.

मराठी वाङमयीन नियतकालिकांच्या विस्तारात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. प्राचीन कवितेबरोबर त्यांनी आधुनिक कवितेची केलेली समीक्षा महत्त्वाची ठरली आहे. त्यांनी मांडलेला तृष्णाबंध साहित्यविचार हा भारतीय साहित्यशास्त्रात महत्त्वाचा गणला गेला आहे.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर