शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

प्र-कुलगुरूपदासाठी कणसे, चौगुले यांच्यासह पाचजणांचे बायोडाटा कुलगुरूंकडे सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2020 12:00 IST

shivajiuniversity, vc, educationsector, kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदावर अधिविभागांतील प्राध्यापकांऐवजी संलग्नित महाविद्यालयांमधील अनुभवी आणि विद्यापीठ कायद्याची माहिती असणाऱ्या प्राचार्यांना संधी द्यावी, अशी आग्रही भूमिका विद्यापीठ प्राचार्य संघटनेने घेतली आहे.

ठळक मुद्देप्र-कुलगुरूपदासाठी कणसे, चौगुले यांच्यासह पाचजणांचे बायोडाटा कुलगुरूंकडे सादर अनुभवी प्राचार्यांना संधी द्या : प्राचार्य संघटनेची मागणी

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदावर अधिविभागांतील प्राध्यापकांऐवजी संलग्नित महाविद्यालयांमधील अनुभवी आणि विद्यापीठ कायद्याची माहिती असणाऱ्या प्राचार्यांना संधी द्यावी, अशी आग्रही भूमिका विद्यापीठ प्राचार्य संघटनेने घेतली आहे.

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे (डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली), प्रवीण चौगुले (डी. आर. माने कॉलेज कागल), व्ही. एम. पाटील (न्यू कॉलेज, कोल्हापूर), आर. आर. कुंभार (दत्ताजीराव कदम आर्टस, कॉमर्स कॉलेज इचलकरंजी), मंगलकुमार पाटील (घाळी कॉलेज, गडहिंग्लज) यांचे बायोडाटा (परिचयपत्र) संघटनेने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे सादर केले आहेत.

माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांचा कार्यकाळ दि. १८ जूनला संपला. त्यानंतर हे पद रिक्त आहे. कुलगुरूपदी डॉ. शिर्के यांच्या निवड झाली आहे. त्यामुळे आता प्र-कुलगुरू निवडीच्या हालचाली गेल्या १५ दिवसांपासून गतीमान झाल्या आहेत. पूर्वी बीसीयुडी संचालक हे पद होते. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार हे पद आता नाही.

या पदाची सर्व कार्यभार प्र-कुलगुरूंकडे देण्यात आला आहे. महाविद्यालयांशी संबंधित संलग्नतेच्या कामांची जबाबदारी या पदावर आहे. त्यामुळे या पदावर अनुभवी प्राचार्यांना संधी द्यावी, अशी आमची आग्रही भूमिका आणि मागणी असल्याचे विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.समन्वय राहीलविद्यापीठ कॅम्पसवरील डॉ. शिर्के यांची कुलगुरूपदी निवड झाली आहे. प्र-कुलगुरूपदांवर प्राचार्यांना संधी दिल्यास विद्यापीठाच्या कामकाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने समन्वय राहण्यास मदत होईल. मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, आदी विद्यापीठांमध्ये प्र-कुलगुरूपदावर प्राचार्यांना संधी दिली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबत याप्रमाणे विचार व्हावा, अशी मागणी प्राचार्य संघटनेची असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर