बांबवडे तालुका शाहूवाडी येथे आयोजित ग्रामपंचायततीच्या पार्श्वभूमीवर विचारविनिमय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी करणसिंह गायकवाड प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना विनय कोरे म्हणाले की, कार्यकर्त्यांमध्ये विचारविनिमय व्हावा. गावागावांतील संघर्ष थांबावा, गावचे ग्रामस्थ हे ग्रामपंचायत निवडणुकीला उभा राहणाऱ्या कार्यकर्त्यांकडे गावचे विश्वस्त प्रतिनिधी या नजरेने पाहत असतात. त्यांच्या अपेक्षा पूर्ण होणे गरजेचे असते. त्यामुळेच आज हा कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
बाजार समितीचे माजी सभापती बाबा लाड म्हणाले की, शाहूवाडी तालुका हा एका ध्येयवादी दिशेने जाणारा तालुका असून, गावासाठी नवे उत्पन्न, नवा रोजगार कसा निर्माण होईल व गाव विकासाच्या दृष्टिकोनातून सामाजिक मूळ प्रवाहात कसे येईल हे आपण सर्वांनी एकीने निर्माण करूया. एकमेकांबद्दल द्वेष करीत बसण्यापेक्षा बिनविरोध संकल्पना समोर येत असेल तर त्याचेही स्वागत करूया.
यावेळी माजी बांधकाम व आरोग्य सभापती सर्जेराव पाटील, बाबासो लाड, आनंदा तोरस्कर, पिशवी, काळू पाटील, सुभाष इनामदार, पंडितराव नलवडे, विष्णू पाटील, ज्ञानदेव वरेकर, दादासो बारगीर, विष्णू यादव, सुभाष पाटील, स्वप्निल घोडे-पाटील उपस्थित होते.
फोटो : बांबवडे येथे कार्यकर्ता मेळाव्यात आमदार विनय कोरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर करणसिंह गायकवाड, महादेव पाटील, बाबा लाड उपस्थित होते.