शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’चे पथक पुण्याला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 12:33 IST

अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित वीरेंद्र तावडे मास्टर मार्इंड असल्याची माहिती ‘सीबीआय’च्या तपासात पुढे येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात औरंगाबाद येथील संशयित सचिन अणदुरेचा सहभाग असण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’चे पथक पुण्यालासचिन अणदुरेच्या सहभागाची शक्यता

कोल्हापूर : अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात संशयित वीरेंद्र तावडे मास्टर मार्इंड असल्याची माहिती ‘सीबीआय’च्या तपासात पुढे येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात औरंगाबाद येथील संशयित सचिन अणदुरेचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने ‘एसआयटी’चे पथक पुण्याला माहिती घेण्यासाठी सोमवारी रवाना झाले. दुसरीकडे शरद कळसकर अणदुरेच्या कोल्हापुरातील कनेक्शनच्या माहितीसाठी दहशतवादी विरोधी पथक (एटीएस) कोल्हापुरात दाखल झाले असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.नालासोपारा येथून अटक केलेला संशयित वैभव राऊत याच्या संपर्कातील संशयित शरद कळसकर, सुधन्वा गोंधळेकर या तिघांना पोलिसांनी पहिल्यांदा अटक केली. त्यानंतर औरंगाबाद येथून अणदुरेला अटक केली.

अणदुरेने दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याची माहिती सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली आहे. तावडे हा दाभोलकर हत्येतील मुख्य संशयित आहेत. नालासोपारा येथील वैभव राऊत व शरद कळसकर हे दोघे वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करीत; पण ते चांगले मित्र आहेत.संशयित कळसकर हा चार वर्षे कोल्हापुरात लेथ मशीनवर काम करीत होता. कळसकर बरोबर वैभव राऊत, सुधन्वा गोंधळेकर हेही कोल्हापुरात येऊन गेले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. त्यामुळे याची माहिती काढण्यासाठी तसेच अणदुरेचे कोल्हापूर कनेक्शन आहे का? या सर्वांचे एकमेकांशी असलेल्या संबंधांचे काम हे पथक करणार आहे.दरम्यान, पानसरे यांच्या हत्येत अणदुरेचा सहभाग असल्याचा संशय ‘एसआयटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे अणदुरेच्या चौकशीसाठी ‘एसआयटी’चे एक पथक पुण्यातआहे. अणदुरेने पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण महाराष्ट्र आणि कर्नाटकात घेतल्याची माहिती तपासात समोर येत आहे.

कर्नाटकातील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील संशयितांनी बेळगावजवळ हत्यार चालविण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती उघड झाली आहे. त्यादृष्टीने अणदुरेचा संबंध आहे का? याची माहिती ‘एसआयटी’कडून घेतली जात आहे. 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेkolhapurकोल्हापूर