शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे हत्या प्रकरणी पुनाळेकर, भावे यांचा ‘एसआयटी’ घेणार ताबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 18:55 IST

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या अ‍ॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’चे पथक ताबा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून १५ जूननंतर अटकेची प्रक्रिया होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. चारही विचारवंतांच्या हत्यांमध्ये वापरलेले पिस्तूल एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देपानसरे हत्या प्रकरणी पुनाळेकर, भावे यांचा ‘एसआयटी’ घेणार ताबान्यायालयीन प्रक्रिया पूर्ण : १५ जूननंतर घडामोडी

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेल्या अ‍ॅड. संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी ‘एसआयटी’चे पथक ताबा घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली असून १५ जूननंतर अटकेची प्रक्रिया होण्याची शक्यता असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. चारही विचारवंतांच्या हत्यांमध्ये वापरलेले पिस्तूल एकच असल्याचे स्पष्ट झाले आहे.डॉ. दाभोलकर, पानसरे, पत्रकार गौरी लंकेश आणि प्रा. एम. एम. कलबुर्गी या चारही विचारवंतांच्या खुनात एकाच प्रकारचे पिस्तूल वापरल्याचा फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे. अ‍ॅड. पुनाळेकर व भावे यांना दाभोलकर हत्येप्रकरणी पुरावे नष्ट केल्याबद्दल सीबीआयने अटक केली आहे. पानसरे हत्येचा तपास करणारे ‘एसआयटी’चे तपास अधिकारी तिरूपती काकडे सीबीआयच्या संपर्कात आहे.

पुणे येथे संशयित पुनाळेकर व भावे यांच्याकडे चौकशी केली आहे. त्यांच्याकडून काही संशयास्पद पुरावे मिळाल्याने सीबीआयची कोठडी संपल्यानंतर एसआयटीने ताबा घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून १५ जूनपर्यंत अटकेची प्रक्रिया पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. पानसरे हत्येचा तपास न्यायालयाच्या निगराणीखाली सुरू आहे. त्यामुळे तपासाबाबत गोपनीयता ठेवली आहे.

दुचाकीसह शस्त्रांचा पत्ताच नाहीपानसरे हत्येमध्ये वापरलेल्या दोन दुचाकी आणि दोन पिस्तुले यांचा अद्यापही ठावठिकाणा तपास पथकाच्या हाती लागलेला नाही. आतापर्यंत नऊ आरोपींपैकी सात आरोपींना अटक केली. त्यांच्या चौकशीमध्ये दुचाकीसह पिस्तुले कोठे लपविण्यात आली, याबाबत काहीच माहिती पथकाला मिळालेली नाही. कळसकर याच्या चौकशीमध्ये ही माहिती मिळणे महत्त्वाचे आहे. पानसरे हत्येतील फरार आरोपी विनय पवार, सारंग अकोळकर, सागर लाखे यांचा अद्यापही ठावठिकाणा मिळालेला नाही.पानसरे हत्येमध्ये १३ आरोपींचा सहभागपानसरे हत्येमध्ये आतापर्यंत नऊ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. ती गुन्हा रजिस्टरवर नोंदही झाली आहेत. आणखी चौघांचा त्यामध्ये सहभाग आहे. १३ संशयितांचा हत्येमध्ये सहभाग असून फरार चौघांना अटक केल्यानंतर हा खटला सुरू होईल, असे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांनी सांगितले.डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्यापानसरे हत्येप्रकरणी अटक केलेल्या शरद कळसकरचा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यामध्ये कळसकरचा सहभाग होता, अशी माहिती तपास यंत्रणेतील एका ज्येष्ठ तज्ज्ञाने दिली. 

 

टॅग्स :Govind Pansareगोविंद पानसरेCourtन्यायालयkolhapurकोल्हापूर