शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

‘पुणे प्रॉपर्टी शोेकेस’चे आज उद्घाटन होणार

By admin | Updated: March 11, 2017 00:39 IST

‘लोकमत’तर्फे आयोजन : पुण्यातील घराचे स्वप्न साकारणार आता कोल्हापूरमध्ये

कोल्हापूर : ‘आॅक्सफर्ड आॅफ द ईस्ट’ अशी ओळख असणाऱ्या पुण्यातील शिक्षणक्षेत्राची दर्जेदारपणासाठी देशभर ओळख आहे. पुण्यात घर असेल तर उच्च शिक्षणासाठी आपल्या मुलांना येथे पाठविणे सोपे होईल, असा विचार राज्याच्या इतर शहरांतील नागरिक करतात. त्याचबरोबर औद्योगिक आणि प्रामुख्याने आयटी क्षेत्राचा विकास पुणे आणि परिसरातच होत असल्याने पुण्यात स्वत:चे घर असणे कुटुंबासाठी फायदेशीर ठरू शकते. या सगळ्यांबरोबरच पुण्यातील घरांच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष राहायचे नसेल तर भविष्यातील चांगली गुंतवणूक म्हणून पुणे शहराकडे सध्या पाहिले जाऊ लागले आहे.पुण्याकडे जाणाऱ्या महाराष्ट्रातील प्रमुख पाच शहरांचा विचार करीत ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाने ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’च्या औरंगाबाद, जळगाव, सोलापूर येथील यशस्वी आयोजनानंतर कोल्हापूर आणि अहमदनगर या शहरांमध्ये केले आहे़ या भव्य गृहप्रदर्शनाचे उद्घाटन मधुसूदन हॉल (हॉटेल पॅव्हेलियन), कोल्हापूर येथे आज, शनिवारी सकाळी १० वाजता महापौर हसिना फरास, बॅँक आॅफ महाराष्ट्रचे झोनल मॅनेजर ए. आर. घाटे, ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे उपाध्यक्ष राजीव परीख, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे अध्यक्ष महेश यादव यांच्या उपस्थितीत होणार आहे़ गेल्या पाच वर्षांपासून ‘लोकमत’ हे ‘पुणे प्रॉपर्टी शोकेस’ या नावाने पुण्यातील नामांकित व प्रथितयश बांधकाम व्यावसायिकांच्या बांधकाम प्रदर्शनाचे कोल्हापुरातआयोजन करीत आहे.यंदा या उपक्रमाचे हे यशस्वी सहावे वर्ष असून, यामध्ये पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे १०० हून अधिक गृहप्रकल्प पाहता येणार आहेत. या गृहप्रदर्शनात अफोर्डेबल होम्स, लक्झुरिअस होम्स, व्यावसायिक प्रकल्प, ओपन प्लॉटस् असे प्रॉपर्टीमधील गुंतवणुकीसाठीचे अनेक पर्याय यावेळी कोल्हापूरकरांना पाहता येणार आहेत़पुणे, पिंपरी-चिंचवड व संपूर्ण पुणे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पांची माहिती एकाच छताखाली मिळणार असल्यामुळे या प्रदर्शनामध्ये वेळेची व पैशांची बचत होणार आहे़ इच्छुक ग्राहकांना आपल्या स्वप्नातील व आपल्या गरजेप्रमाणे हवे असणारे मनपसंत घर येथे पाहता येणार आहे़ या प्रदर्शनासाठी बांधकाम व्यावसायिकांनी अनेक वैशिष्ट्यपूर्ण व आकर्षक योजना आखल्या आहेत़ त्यांचाही लाभ या प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना मिळणार आहे़ गेल्या पाच वर्षांमध्ये कोल्हापूरमधील अनेक इच्छुकांनी आपले पुण्यातील घर नक्की करीत, हे प्रदर्शन यशस्वी बनविण्यास मदत केली आहे़ पुण्यातील गृहप्रकल्पांची सखोल व सविस्तर माहिती मिळण्याची वर्षातील एकमेव संधी आज, शनिवारी व उद्या, रविवारी असून, इच्छुक नागरिकांनी या भव्य प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या गृहस्वप्नांची पूर्तता करावी, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे़या प्रदर्शनास बँकिंग पार्टनर बँक आॅफ महाराष्ट्र आहे. बॅँक आॅफ महाराष्ट्राने इच्छुक ग्राहकांचे उत्पन्न विचारात घेऊन ताबडतोब तत्त्वत: गृहकर्ज मंजुरीपत्र देण्याची व्यवस्था केली आहे. सहभागी नामांकित बांधकाम व्यावसायिकप्लेटॉर लाईफ स्पेसेस प्रा. लि., भंडारी असोसिएट्स़, मॅपल गु्रप,परांजपे स्कीम्स, गार्डियन डेव्हलपर्स, नाईकनवरे डेव्हलपर्स प्रा़ लि़, कोलते-पाटील डेव्हलपर्स, निर्माण डेव्हलपर्स, मंत्रा प्रॉपर्टीज, अमित एंटरप्रायजेस हाउसिंग लि., सार्थक हाउसिंग, सुमेरू ग्रुप, बी पाझिटिव्ह ग्रुपशनिवारवाड्यासोबत सेल्फीलोकमत आयोजित पुणे प्रॉपर्टी प्रदर्शनात शनिवारवाड्याची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. तिथे खास पुणेरी पगडी व उपरणे ठेवण्यात आले आहे. प्रदर्शनास भेट देणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी हा शनिवारवाड्यासोबतचा सेल्फी कॉर्नर उभारण्यात आला आहे.