शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
2
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
3
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
4
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
5
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
6
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
7
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
8
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
9
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
10
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
11
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
12
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
13
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
14
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
15
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
16
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
17
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
18
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
19
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
20
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पदवीधरसाठी शिक्षक मतदार हायटेक; मात्र, नोंदणी पारंपरिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 17:52 IST

गैरसोयीमुळे बेजार : ऑनलाईन नोंदणीची सुविधा सुरू करण्याची मागणी

कोल्हापूर : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये शिक्षकांसाठी मतदार नोंदणीची व्यवस्था केवळ ऑफलाईन म्हणजे पारंपरिक पद्धतीनेच केली जात आहे. सार्वत्रिक निवडणुकीत मतदार अल्पशिक्षित असताना ऑनलाईन मतदार नोंदणीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याउलट शिक्षित, उच्चशिक्षित, हायटेक मतदार असूनही शिक्षक मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. ऑफलाईन नोंदणीसाठी त्यांना शासकीय कार्यालयात जावे लागत आहे.पुणे पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी ३० सप्टेंबरपासून मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. प्रत्येक निवडणुकीसाठी नवीन मतदार यादी पात्र असते. यामुळे जुन्या आणि नवीन मतदारांना नोंदणीसाठी धावपळ करावी लागत आहे. एक नोव्हेंबर २०२५ पूर्वी किमान तीन वर्षांपूर्वी पदवी घेतलेले नवीन मतदार नोंदणीसाठी पात्र आहेत. पदवीधरसाठी https://mahaelection.gov.in यावरून ऑनलाईन नोंदणी करता येते.

मात्र शिक्षक मतदार नोंदणीसाठी अद्याप अशा कोणत्याही प्रकारची ऑनलाईन सुविधा नाही. यामुळे शिक्षकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करून शासकीय कार्यालयात जावून मतदार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. शिक्षक मतदारही ऑनलाईन सुविधा सुरू करावी, अशी मागणी करीत आहेत. त्यांची मागणी निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे. मात्र अजून सुविधा सुरू झालेली नाही.

सहा नोव्हेंबर मतदार नोंदणीची अंतिम मुदतमतदार नोंदणीची अंतिम मुदत सहा नोव्हेंबर आहे. २५ नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ३० डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. सध्या शासकीय सुट्टीचा दिवस वगळता इतर दिवशी कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जात आहे.

पुणे पदवीधरसाठी शिक्षक मतदार नोंदणीची केवळ ऑफलाईन प्रक्रिया राबवली जात आहे. पदवीधर मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा आहे. -शक्ती कदम, प्रभारी उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Graduate teacher voters are tech-savvy, registration remains traditional.

Web Summary : Pune division teacher voter registration is offline only, unlike graduates' online option. Despite being tech-savvy, teachers face inconvenience due to offline registration requirements, prompting calls for online access.