शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

दूध अनुदानात राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर, राज्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत किती कोटींचे वाटप झाले..वाचा

By राजाराम लोंढे | Updated: December 19, 2024 14:00 IST

सात रुपयांच्या अनुदानाची प्रतीक्षा

राजाराम लोंढे कोल्हापूर : राज्य शासनाने गाय दूध अनुदानापोटी वाटप केलेल्या पहिल्या टप्यात पुणे जिल्हा आघाडीवर राहिला आहे. आतापर्यंत राज्यात वाटप झालेल्या ५३४ कोटी १७ लाख अनुदानापैकी १६९ कोटी ८२ लाख पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादकांना मिळाले आहे. शासनाने तरतूद केलेल्या ७५८ कोटींपैकी ११० कोटी ८४ लाख रुपये सप्टेंबरअखेरचे अनुदान देय आहे. त्यानंतर ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील अनुदान द्यावे लागणार आहे.गाय दूध खरेदी दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने ११ जानेवारी ते १० मार्च या दोन महिन्यांसाठी प्रतिलिटर तीन रुपये अनुदान दूध उत्पादकांना देण्याचा निर्णय घेतला. ११ मार्च ते ३० जूनपर्यंत दूध अनुदान बंद केले होते. त्यानंतर १ जुलै ते ३० सप्टेंबरअखेर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनुदानात वाढ करून ऑक्टोबर व नोव्हेंबरसाठी सात रुपये केले.

पहिल्या टप्प्यातील ५३४ कोटी १७ लाख ८० हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील अनुदानापैकी ११० कोटी ८४ लाख ४१ हजार रुपये शेतकऱ्यांना देय आहे. त्यानंतर जवळपास ६४८ कोटी रुपये हे ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यातील दुधासाठी द्यावे लागणार आहेत. राज्य शासनाने ७५८ कोटींची तरतूद केली असून दुधाची माहिती भरल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

कोल्हापूरपेक्षा सातारा अनुदानात पुढेविस्ताराने व दूध उत्पादनात सातारापेक्षा कोल्हापूर पुढे आहे. तरीही दूध अनुदानात सातारा पुढे राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या एकूण दूध उत्पादनाच्या ५० टक्के दूध हे म्हशीचे आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा दूध अनुदानात राज्यात पाचव्या क्रमांकावर राहिला आहे.

जिल्हानिहाय मिळालेले व देय अनुदानजिल्हा - वाटप -  देयपूणे : १६९.८२ कोटी - १३.७३ कोटीअहिल्यानगर : १५२.१२ कोटी - २७.८७ कोटीसोलापूर : ७५.२१ कोटी - १४.५८ कोटीसातारा : ३९.६७ कोटी - ४.०५ कोटीकोल्हापूर : २६.७० कोटी -  ९.५४ कोटीसांगली : २२.३९ कोटी - १८.३० कोटीनाशिक : १७.०५ कोटी - ६.५२ कोटीछत्रपती संभाजीनगर : १०.५६ कोटी - ५.७३ कोटीधाराशिव : ६.९२ कोटी - ४.१७ कोटीबीड : ६.३४ कोटी - ३.०९ कोटीजळगाव : ५.०८ कोटी - २.२५ कोटीनागपूर : ७९.०३ लाख - २६.८० लाखलातूर : ३३.८१ लाख - १४.६७ लाखजालना : ३१.७९ लाख - २६.२५ लाखधुळे :  २०.६३ लाख -   ४.३३ लाखअमरावती : १८.५४ लाख -  ११.८५ लाखभंडारा : १७.०९ लाख - ६.२३ लाखबुलढाणा : १४.८० लाख -  ३.६६ लाखवर्धा :  ५.७३ लाख- ७५ हजारपरभणी : ३.९३ लाख -  ८० हजारनांदेड :  ४६ हजार  - शून्य

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPuneपुणेmilkदूध