शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल पुनाळेकरला अटक करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2019 11:18 IST

अ‍ॅड. गोविंद पानसरे खून खटल्यातील साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल संजीव पुनाळेकरला त्वरित अटक करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, आदी मागण्यांसाठी  डावी आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी देशमुख यांनी, तपासात नावे निष्पन्न होतील तशी कारवाई होणारच असल्याचा निर्वाळा शिष्टमंडळास दिला.

ठळक मुद्देसाक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल पुनाळेकरला अटक कराडाव्या आघाडीची मागणी : पोलीस अधीक्षकांशी केली चर्चा

कोल्हापूर : अ‍ॅड. गोविंद पानसरे खून खटल्यातील साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल संजीव पुनाळेकरला त्वरित अटक करावी, सनातन संस्थेवर बंदी घालावी, आदी मागण्यांसाठी  डावी आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यावेळी देशमुख यांनी, तपासात नावे निष्पन्न होतील तशी कारवाई होणारच असल्याचा निर्वाळा शिष्टमंडळास दिला.दहशतवादी कारवायांमध्ये अडकलेल्या व धार्मिक कार्याच्या बुरख्याआडून खुनी हिंसक, अतिरेकी कारवाया करणाऱ्या या आरोपींना दहशतवादी व अतिरेकी म्हणून जाहीर करावे, असे सांगून डाव्या आघाडीच्या वतीने मागण्यांचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक देशमुख यांना देण्यात आले.पोलीस अधीक्षक देशमुख यांनी, एसआयटीला सर्व मागण्या कळविण्याचे आश्वासन दिले. तसेच सीबीआय, एसआयटी आणि बंगलोर एसआयटी हे तिन्हीही संस्था चारही खून खटल्यांमध्ये अत्यंत समन्वयकपणे काम करत आहेत. तपासात संशयित आरोपी निष्पन्न होतील त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. अनेकवेळा तपासात तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे तपास काम उकलताना उशीर होत आहे; पण तपासकाम योग्य दिशेने सुरूअसल्याचा निर्वाळा देशमुख यांनी दिला.डाव्या आघाडीच्या शिष्टमंडळात सतिशचंद्र कांबळे, नामदेव गावडे, गिरीश फोंडे, चंद्रकांत यादव, रवी जाधव, प्रशांत आंबी, बाळासाहेब बर्गे, दिलावर मुजावर, शिवाजी माळी, बन्सी सातपुते, इर्शाद फरास, मुकुंद कदम, जावेद तांबोळी, सुनील कोळी, आरती रेडेकर, आदींचा समावेश होता.मागण्या ...

  1. पानसरे खून खटल्यात साक्षीदाराला धमकी दिल्याबद्दल पुनाळेकरला अटक करावी.
  2. सर्व पोलीस ठाण्यांत फरारी आरोपींची छायाचित्रे लावावीत, भित्तीपत्रके सर्व चौका-चौकांत, बसथांबे, गर्दीच्या ठिकाणी लावावीत, आदी मागण्या करण्यात आल्या.
  3.  गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर खुनातील आरोपींना अतिरेकी व दहशतवादी जाहीर करावे.
  4. सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांच्या अटकेसाठी ‘लूक आऊट’ नोटीस जारी करावी.
  5.  सर्व सनातनच्या आश्रमामध्ये विनय पवार व सारंग अकोलकर यांना पकडण्यासाठी कोम्बिंग आॅपरेशन करावे.
  6.  सनातन संस्थेवर बंदी घालावी.

 

 

टॅग्स :Sanatan Sansthaसनातन संस्थाkolhapurकोल्हापूर