शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्या महागल्या, कोल्हापूरकरांना कडधान्यांचा आधार; दुधाची तहान ताकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:33 IST

गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरकरांना कडधान्यांचा आधार; चढे दर खिशाला परवडेनासेपूरपरिस्थितीमुळे पालेभाज्यांची आवक मंदावली

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.रोजच्या जेवणात नियमितपणे अनेकांना भाजीपाला असल्याशिवाय जेवण जात नाही. मात्र, अशा खवय्यांना गेल्या आठवडाभरात केवळ आणि केवळ कडधान्यांचे मोड आलेले उसळ, आमटीवरच पालेभाजीची तल्लफ भागवावी लागत आहे. अशा या कडधान्यांमध्ये स्वयंपाक त्वरित होणारा पदार्थ म्हणून मसूरडाळ सध्या जोर सुरू आहे.

पूरग्रस्तांच्या पातळ भाजीमध्ये हाच पदार्थ अधिक दिसत आहे. याशिवाय मूग, चवळी अशा कडधान्यांची उसळ जेवणात हमखास दिसत आहे. या कडधान्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. घाऊक बाजारात मसूर ६० रुपये नियमित, तर बेळगावी १२० ते १३० रुपये असा प्रतिकिलो दर आहे.

मटकी १२०, तर मूग ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे आहे. हाच दर किरकोळ व्यापाऱ्यांकडे दहा ते वीस रुपये जादा दराने ग्राहकांना पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल असे कडधान्य खरेदीकडे वाढला आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागविली जात आहे. दर कमी असल्याने अशा प्रकारची भाजी रोजच्या जेवणात हमखास मेन्यू बनली आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरvegetableभाज्या