शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूद, कामे १५ दिवसांत करण्याच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 15:09 IST

कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूद करून खराब रस्त्यांचे तत्काळ पुनर्पृष्ठीकरण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिले. रस्त्यांची कामे तत्काळ करण्यासाठी सभापती देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यामध्ये त्यांनी हा आदेश दिला.

ठळक मुद्देरस्त्यांसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूदकामे १५ दिवसांत करण्याच्या सूचना

कोल्हापूर : शहरातील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी एक कोटी ६२ लाखांची तरतूद करून खराब रस्त्यांचे तत्काळ पुनर्पृष्ठीकरण करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख यांनी गुरुवारी दिले. रस्त्यांची कामे तत्काळ करण्यासाठी सभापती देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती, त्यामध्ये त्यांनी हा आदेश दिला.सभापती देशमुख यांनी पावसामुळे शहरातील खराब झालेल्या रस्त्यांसाठी सर्वसाधारण रस्ता अनुदानातून ७५ लाख, प्रत्येक सदस्याच्या ऐच्छिक पॅचवर्क निधीमधून ५० हजारांप्रमाणे ४० लाख व महापालिका स्वनिधीमधून ४७ लाख अशी एकूण एक कोटी ६२ लाखांची तरतूद करून दिली.शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सध्या महापालिकेमार्फत पॅचवर्कची कामे सुरू असून प्लँटवर डांबराचा साठाही पुरेसा ठेवण्यात आला आहे. महापालिकेकडे पुनर्पृष्ठीकरणाच्या कामासाठी कर्मचारी अपुरे पडत असल्याने ही कामे पूर्ण करण्यासाठी एक-दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शहरातील रस्त्यांच्या तत्काळ पुनर्पृष्ठीकरणासाठी अल्प मुदतीची निविदा आजच प्रसिद्ध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.विभागीय कार्यालयनिहाय निविदाही प्रसिद्ध करीत असल्याचे ते म्हणाले. या कामाची निविदा अंतिम झाल्यावर किमान पाच ते आठ ठेकेदारांमार्फत शहरात एकाच वेळी कामे सुरू करता येतील, असेही सरनोबत यांनी सांगितले.यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, गटनेता नियाज खान, नगरसेवक संजय मोहिते, राजाराम गायकवाड, नगरसेविका सविता भालकर, गीता गुरव, भाग्यश्री शेटके, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे, लेखापाल संजय सरनाईक, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश मस्कर, आर. के. जाधव, हर्षजित घाटगे, रावसाहेब चव्हाण उपस्थित होते. 

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर