चंदगड : ताम्रपर्णी नदीवर बांधण्यात आलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे जुने बांधकाम ढासळले असून, नवीन बंधाऱ्यासाठी भरीव निधी मिळावा अशी मागणी आमदार राजेश पाटील यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दळणवळण व पाणी अडविण्यासाठी महत्त्वाचा हा बंधारा सध्या धोकादायक स्थितीत आहे. केवळ पाणी अडविण्याच्या उद्देशाने ताम्रपर्णी नदीवर दुंडगे-कुदनूरदरम्यान बांधण्यात आलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा धोकादायक बनला आहे. या बंधाऱ्याचे पिलर ढासळले आहेत, त्यामुळे या बंधाऱ्यात पाणी साठा होत नसल्याने शेतीला पाणी पुरत नसून शेतकरी अडचणीत सापडला आहे. दळणवळणासाठी व शेतीला पाणी अडविण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या बंधाऱ्याच्या दुरुस्तीबरोबरच नवीन पूल बांधण्यासाठी भरीव निधी मिळावा, अशी मागणी आ. पाटील यानी मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या ठिकाणी नवीन पुलासाठी निधी मिळाल्यास या भागातीत शेतकऱ्यांची मोठी सोय होणार आहे.
फोटो ओळी :--
कोल्हापूर येथे नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना दुंडगे पुलासंदर्भात निवेदन देताना आमदार राजेश पाटील.