शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

'अधिकाऱ्यांपेक्षा दगड बरा' म्हणत दगडांची पूजा करत नोंदविला निषेध, कोल्हापूर महापालिकेत अनोखे आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 19:39 IST

कोल्हापूर नेक्स्टच्या कार्यकर्त्यांचा प्रश्नांचा भडिमार

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या बेजबाबदार आणि भ्रष्ट कारभाराविरोधात सातत्याने पाठपुरावा करूनही काहीच कारवाई होत नसल्याने ‘अधिकाऱ्यांपेक्षा दगड बरा’ असे म्हणत कोल्हापूर नेक्स्टच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी अधिकाऱ्यांच्या समोरच दगडांची पूजा करून अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला.महानगरपालिकेत सुमारे दाेन तासांहून अधिक काळ झालेल्या महा जनसुनावणीत नागरिकांनी बेकायदेशीर बांधकामे, पार्किंगमधील अतिक्रमणे, आणि प्रलंबित तक्रारींबाबत प्रश्नांचा भडिमार केला. मात्र, अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे देण्यात अपयश आल्यामुळे कार्यकर्त्यांचा संयम सुटला. कोल्हापूर नेक्स्टचे निमंत्रक चंद्रकांत चव्हाण, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी विविध तक्रारी मांडल्या.सर्व प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संयम सुटलेल्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या समोरच दगडाची हळद-कुंकू आणि हार घालून पूजा केली. उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने दगड बाजूला केले. त्यानंतर माजी नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील यांनी, “आज आम्ही तुमचा प्रतीकात्मक निषेध केला आहे. प्रलंबित प्रश्नांवर तातडीने कारवाई झाली नाही तर यापेक्षा अधिक तीव्र संतापास तुम्हाला सामोरे जावे लागेल.” असा इशारा अधिकाऱ्यांना दिला.नगररचना सहायक संचालक विनय झगडे आणि सहायक नगररचनाकार एन. एस. पाटील यांनी तक्रारींची तातडीने दखल घेण्याचे आश्वासन दिले.

पाचवा मजला बेकायदेशीर, सहाव्या मजल्याला परवानगी कशी?प्रद्माकर कुलकर्णी यांनी पाचवा मजला बेकायदेशीर ठरवल्यानंतर सहाव्या मजल्याला कशी परवानगी देता, असा सवाल केला. शेफाली मेहता यांनी पार्किंगमधील विनापरवाना बांधकामांची जंत्रीच वाचून दाखवली. प्रसाद पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी केलेल्या तक्रारीवर कारवाई न झाल्यामुळे चार मजली इमारत बांधल्या गेल्याचे निदर्शनास आणून दिले.

अस्लम जमादार यांनी महापालिकेच्या जागेवर बांधल्या जात असलेल्या इमारतीबद्दल तक्रार दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊनही कारवाई न झाल्याचे सांगून संताप व्यक्त केला. यशवंत माने, ओंकार गोसावी, मिथुन मगदूम, गणेश राणे, शुभम महेकर, सुहास गुरव, उदय पाटील यांनीही आपल्या तक्रारींबद्दल अधिकाऱ्यांना अवगत केले.