शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विरोधकांची सद्दाम हुसेनपेक्षा मोठी हुकूमशाही  : महादेवराव महाडिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 11:29 IST

‘राजाराम’ साखर कारखान्याचे अध्यक्ष हरिष चौगले व त्यांच्या पत्नी या डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे सभासद आहेत. सैतवडे येथे जमीन नसतानाही त्यांना सभासद केले, अशांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये. विरोधकांची सद्दाम हुसेनपेक्षाही मोठी हुकूमशाही असल्याची टीका

ठळक मुद्देगोकुळ’ मध्ये धर्मयुद्ध होणारच, दूध संस्थांचा मल्टिस्टेटला पाठिंबा असल्याने कोणतीही अडचण नाहीभाड्याने माणसे आणून सरकारचे अनुदान घेतले जाते. आम्ही लोकशाही मानतो, त्यानुसारच आमची वाटचाल

कोल्हापूर : ‘राजाराम’ साखर कारखान्याचे अध्यक्ष हरिष चौगले व त्यांच्या पत्नी या डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे सभासद आहेत. सैतवडे येथे जमीन नसतानाही त्यांना सभासद केले, अशांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये. विरोधकांची सद्दाम हुसेनपेक्षाही मोठी हुकूमशाही असल्याची टीका माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर केली. ‘गोकुळ’ मध्ये रविवारी धर्मयुद्ध होणारच आहे.

‘राजाराम’ कारखान्याच्या सभेनंतर महाडिक पत्रकारांशी बोलत होते. महाडिक म्हणाले, ‘डी. वाय.’ कारखान्यात एका रात्रीत ४३०० सभासदांना कोणत्याही प्रकारची नोटीस न देता, तेही खोट्या सह्या करून घरी घालविले. मार्केट कमिटीतील मोहन सालपेंच्या चाणक्यनितीतून हे घडले आहे. कदमवाडीतील हॉस्पिटल बंद पडले, भाड्याने माणसे आणून सरकारचे अनुदान घेतले जाते. आम्ही लोकशाही मानतो, त्यानुसारच आमची वाटचाल सुरू असून ‘गोकुळ’ची सभाही आम्ही लोकशाही पद्धतीनेच घेऊ. ‘गोकुळ’ मध्ये सध्या सत्य-असत्य आणि निती-अनितीचे धर्मयुद्ध सुरू आहे. मला खात्री आहे, विजय हा सत्याचा होणार आहे. बहुतांशी दूध संस्थांचा मल्टिस्टेटला पाठिंबा असल्याने कोणतीही अडचण नाही, असेही महाडिक यांनी सांगितले. यावेळी माजी महापौर शिवाजीराव कदम, सुनील कदम, सत्यजित कदम, आदी उपस्थित होते.अहवाल दाखविल्यास ५१ हजारलोकशाहीची वल्गना करणाऱ्यांच्या कारखान्यात काय चालले आहे. डी. वाय. पाटील साखर कारखान्याचा अहवाल दाखविणाºयांना ११ हजारांचे बक्षीस देतो, अशी घोषणा यापूर्वीच केली आहे; पण अद्याप कोणीही अहवाल दिलेला नाही. आता कोणीही अहवाल दिला, तर बावड्यात तो वाजत-गाजत आणून देणाºयास ५१ हजारांचे बक्षीस देऊ, असेही महाडिक यांनी सांगितले.मल्टिस्टेटच्या बाजूने २७८० ठरावमल्टिस्टेटला पाठिंबा देण्याबाबत आम्ही जिल्ह्यातील दूध संस्थांना आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन ३६०० पैकी २७८० संस्थांनी मल्टिस्टेटला पाठिंबा दिल्याने आम्हाला चिंता नसल्याचे महाडिक यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर