शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कृषी मंत्री कोकाटे यांच्या विरोधात गनिमी काव्याने आंदोलन

By भीमगोंड देसाई | Updated: February 20, 2025 14:41 IST

कोल्हापूर - भिकारी सुद्धा एक रूपया घेत नाही, आम्ही एक रूपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ...

कोल्हापूर - भिकारी सुद्धा एक रूपया घेत नाही, आम्ही एक रूपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही दिवसांपूर्वीच केल होते. दरम्यान, ते आज शुक्रवारी कृषी प्रदर्शनाच्या उदघाटनासाठी येत आहेत. त्यांनी कोल्हापुरात येण्याआधी शेतकऱ्यांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात गनिमी काव्याने आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित पोवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिला.

पोवार म्हणाले, पीक विमा घोटाळा प्रकरणात सत्ताधारी पक्षाचे लोक सामील आहेत. अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. महायुतीतील या सरकारमधील कृषीमंत्री शेतकऱ्यांना लाचार, भिकारी म्हणत आहे. शेतकरी अडचणीत आहे. त्याला मदत करण्याऐवजी थट्टा केली जात आहे. वादग्रस्त वक्तव्याबाबत मंत्री कोकाटे यांनी अजूनही शेतकऱ्यांची माफी मागितलेली नाही. ते आज, शुक्रवारी एका कार्यक्रमासाठी येत आहेत. त्यांना स्वाभिमानीच्या स्टाईलने हिसका दाखवण्यात येईल. पत्रकार परिषदेस धनाजी पाटील, डॉ. बाबासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, सुनील सूर्यवंशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.शेतकऱ्यांनी वीज थकबाकी भरू नये..

पोवार म्हणाले, विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी साडेसात अश्चशक्तीपर्यंतच्या कृषी पंपधारकांना मोफत वीजचे घोषणा केली. तीन महिन्याचे वीज बिल शून्यही केले. शून्य बिलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे फोटो होते. आता थकबाकीसह बिले आली आहेत. त्यावरील फोटो गायब आहेत. बिल भरमसाठी आली आहेत. मात्र कृषी पंपधारकांनी बिले भरू नये. बिले मागायला येणाऱ्यांना चांगला धडा शिकवा.

टॅग्स :Manikrao Kokateमाणिकराव कोकाटेkolhapurकोल्हापूर