शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

आयुक्तसाहेब धुळीपासून संरक्षण करा...: खराब रस्त्यांवरुन बिंदू चौकात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 16:05 IST

कोल्हापूर शहरातील खराब झालेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य झाले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने रस्ते करुन धुळीपासून आमचे संरक्षण करा, या मागणीसाठी सोमवारी बिंदू चौकात शालेय विद्यार्थी आणि जिल्हा वाहनधारक महासंघाने निदर्शने केली.

ठळक मुद्दे खराब रस्त्यांवरुन बिंदू चौकात निदर्शनेशालेय विद्यार्थी, वाहनधारक महासंघ

कोल्हापूर : शहरातील खराब झालेल्या रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य झाले आहे. नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने रस्ते करुन धुळीपासून आमचे संरक्षण करा, या मागणीसाठी सोमवारी बिंदू चौकात शालेय विद्यार्थी आणि जिल्हा वाहनधारक महासंघाने निदर्शने केली.

मास्क घालून आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थ्यांनी लक्ष वेधले. गंगावेश येथे खड्ड्यांचा वाढदिवस करणे, शहर अभियंतावर गुन्हे दाखल करणे आणि महापालिकेच्या महासभेला वाहनासह घेराव घालण्यात येणार असल्याचे वाहनधारक संघाने इशारा दिला आहे.शहरातील खराब रस्त्यांसंदर्भात जिल्हा वाहनधारक महासंघाच्यावतीने जनआंदोलन सुरु केले आहे. खड्ड्यांचे लग्न, महारास्ता रोको आंदोलन केले. यानंतर प्रशासनाने १५ दिवसांत पॅचवर्क करु, अशी ग्वाही दिली होती. अद्यापही रस्ते करण्यात आले नसल्यामुळे पुन्हा वाहनधारक महासंघाने आंदोलनाचे सुरु केला आहे.

वाहनधारक महासंघ आणि वि.स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बिंदू चौकात अभिनव आंदोलन केले. ‘मुक्त करा, मुक्त करा’, ‘आयुक्त साहेब धुळीपासून मुक्त करा’, ‘स्वच्छ हवा आमच्या हक्काची’, ‘खोटरड्या महापालिकेचा धिक्कार’असो अशा घोषणा दिल्या. यावेळी वाहनधारक महासंघाचे अभिषेक देवणे, विजय गायकवाड, पोपट रेडकर, पुष्पक पाटील, दिनमंहमद शेख, रोशन माने, ओंकार ओतारी, भास्कर भोसले, योगेश श्ािंदे यांच्यासह वि.स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते.विद्यार्थी मास्क घालूनच आंदोलनातशाहूपुरी, व्यापारी पेठ येथील वि.स. खांडेकर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी धुळीमुळे त्रास होत असल्यावरुन वाहनधारक महासंघाच्या आंदेलनात सहभाग घेतला. स्वच्छ हवेच्या मागणीसाठी मास्क लावूनच विद्यार्थी आले होते. ‘आयुक्त साहेब धुळीपासून सरंक्षण द्या’, ‘मोकळी हवा आमचा अधिकार आहे’ असे घेतलेले फलक लक्षवेधी ठरले. 

 

टॅग्स :Morchaमोर्चाStudentविद्यार्थीkolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका