शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध शाळा अभियानामुळे शाळांचा चेहरा बदलेल : यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 14:49 IST

कोल्हापू महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत महापालिकेच्या शाळांच्या उन्नतीसाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू समृद्ध शाळा अभियान’ची अंमलबजावणी सुरू करण्यात येत असून, त्यामुळे शाळांचा चेहरामोहरा बदलेल, असे प्रतिपादन प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी येथे बोलताना केले.

ठळक मुद्देसमृद्ध शाळा अभियानामुळे शाळांचा चेहरा बदलेल : यादव महापालिकेच्या शाळा मुख्याध्यापकांची कार्यशाळा

कोल्हापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीमार्फत महापालिकेच्या शाळांच्या उन्नतीसाठी ‘राजर्षी छत्रपती शाहू समृद्ध शाळा अभियान’ची अंमलबजावणी सुरू करण्यात येत असून, त्यामुळे शाळांचा चेहरामोहरा बदलेल, असे प्रतिपादन प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी येथे बोलताना केले. महापालिकेच्या शाळांचे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची कार्यशाळा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते.शहरात महापालिकेच्या एकूण ५९ शाळा कार्यरत असून, सेमी-इंग्लिश, डिजिटल क्लासरूम, बोलक्या भिंती, मॉडेल स्कूल, ज्ञानरचनावाद, संगणक प्रयोगशाळा ई-लर्निंग असे उपक्रम राबवून शाळांनी गुणवत्ता टिकविली आहे. तथापि, शाळा अधिक उन्नत व्हाव्यात या दृष्टिकोनातून हे अभियान राबविले जात आहे.

यासाठी शाळांचे पटसंख्येनुसार तीन गट करण्यात आले आहेत. शाळाशाळांमधून निकोप स्पर्धा निर्माण होऊन विद्यार्थी पटसंख्येबरोबरच भौतिक सुविधांची उपलब्धता, आनंददायी शिक्षण, नवोपक्रम, अध्ययन स्तरात वाढ करणे, समाज सहभागातून शैक्षणिक सुविधांची उपलब्धता करणे, इत्यादी बाबी शाळांनी राबवावयाच्या आहेत, असे यादव यांनी सांगितले.अभियानाच्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये शाळांचे मूल्यांकन केले जाणार आहे. मूल्यांकनानुसार व पटसंख्येच्या निकषांनुसार शाळांमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढून समारंभपूर्वक त्यांना रोख बक्षीस व ट्रॉफी दिली जाणार आहे. प्रथम बक्षीस २० हजार, द्वितीय बक्षीस १५ हजार, तृतीय बक्षीस १० हजार व उत्तेजनार्थ पाच हजार इतके असणार आहे.कार्यशाळेस ‘समग्र शिक्षा’चे कार्यक्रमाधिकारी रसूल पाटील, लेखापाल बाबा साळोखे, पर्यवेक्षक विजय माळी, बाळासो कांबळे, उषा सरदेसाई, जगदीश ठोंबरे, सूर्यकांत ढाले, सचिन पांडव, अजय गोसावी, संजय शिंदे, नीलेश सरनाईक, नचिकेत सरनाईक, शांताराम सुतार, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व सेवक उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरSchoolशाळा