शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मराठा तरुणांना लागू होणाऱ्या योजना प्रस्तावित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 12:17 IST

Maratha Sarthi Kolhapur : सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकास, औद्योगिक वसाहत, कृषी आणि जिल्हा उद्योग केंद्राशी निगडीत कोण कोणत्या योजना लागू होतील, त्या योजनांचा लाभ तरुणांना कसा मिळू शकेल याबाबतच्या योजना प्रस्तावित करा, अशा सूचना सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी गुरुवारी केल्या.

ठळक मुद्दे मराठा तरुणांना लागू होणाऱ्या योजना प्रस्तावित करा सारथी उपकेंद्राचा बैठकीत अशोक काकडे यांनी केल्या सूचना

कोल्हापूर : सारथीच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना कौशल्य विकास, औद्योगिक वसाहत, कृषी आणि जिल्हा उद्योग केंद्राशी निगडीत कोण कोणत्या योजना लागू होतील, त्या योजनांचा लाभ तरुणांना कसा मिळू शकेल याबाबतच्या योजना प्रस्तावित करा, अशा सूचना सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी गुरुवारी केल्या.कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ताराराणी सभागृहात आयोजित या उपकेंद्राचा मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी भविष्यकालीन योजना राबविण्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर, निबंधक तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी अशोक पाटील, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार उपस्थित होते.अशोक काकडे म्हणाले, सारथी संस्थेस ठरवून दिलेल्या उद्दिष्टांनुसार येथील मराठा आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या सामाजिक, शैक्षणिक विकासाकरिता सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने ज्या संस्था, घटकांकडून सूचना मिळाल्या आहेत त्यांचा विचार करून त्या अंमलात आणल्या जातील. पुण्यातील सारथी संस्था सुरू झाल्यापासून पहिल्या वर्षी एम.फीलच्या ५०२ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आल्या आहेत.यावेळी शिवाजी विद्यापीठ, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र, एमआयडीसी, जिल्हा उद्योग केंद्र, कृषी विभाग, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण यांच्यासह सारथीशी संलग्न संस्थांचाही आढावा घेण्यात आला. यावेळी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर, कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे, जिल्हा कौशल्य विकासचे सहायक संचालक संजय माळी यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.असंतोष का हे समजून घ्याडॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, मराठा समाजातील तरुणांची मुस्कटदाबी, अन्याय कोठे होत आहे, त्यांचे मागासलेपण, या मुलांमध्ये एवढा असंतोष का आहे हे शोधून त्यावर उपाययोजना करा. आपल्याला न्याय मिळत आहे असे त्याला वाटावे, असे काही करा. शिवाजी विद्यापीठातील शाहू संशोधन केंद्राची व्याप्ती वाढवताना पदव्युत्तर, पीएच.डी., फेलोशिप सुरू करताना, विषय सुचवण्यासह लागेल ते सहकार्य करू.

 

टॅग्स :marathaमराठाcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर