शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

घरफाळा वाढीचा प्रस्ताव प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2017 00:45 IST

महापालिका सभा : आधी थकबाकी वसुलीची सूचना

कोल्हापूर : घरफाळा, पाणीपट्टी दरवाढीचे प्रस्ताव देणाऱ्या प्रशासनाने आधी कोट्यवधींची थकबाकी वसूल करावी, आपली कुचकामी यंत्रणा सुधारावी, असा सल्ला नगरसेवकांनी सोमवारी महानगरपालिका सर्वसाधारण सभेत प्रशासनास दिला. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निष्क्रियपणामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचा आरोप सभेत करण्यात आला. सुमारे साडेचार तास कामकाज झाल्यानंतर दरवाढीवर कोणताही निर्णय न घेताच सभाध्यक्ष महापौर हसिना फरास यांनी सभा तहकूब केली. शहरातील मिळकतींचे भांडवली मूल्य हे जानेवारी २०१५ च्या रेडिरेकनर दरावर आधारित निश्चित करावेत तसेच कराचे दर मागील वर्षाप्रमाणेच कायम ठेवावेत आणि पाणीपट्टी दरात वाढ करावी हे प्रशासनाचे दोन्ही महत्त्वाचे प्रस्ताव सोमवारी झालेल्या सभेत पुन्हा प्रलंबित ठेवले गेले. त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. प्रशासनाने विनंती करूनही या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे महासभेने टाळले. परिणामी नवीन वर्षाचे अंदाजपत्रक सादर करण्याबाबत प्रशासनासमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. अधिकाऱ्यांचा नकारात्मक दृष्टिकोन, कर्मचाऱ्यांचे पैसे मिळवायची वृत्ती यामुळे गेल्या काही वर्षांत घरफाळा विभागाची थकबाकी तब्बल ७३ कोटी ९२ लाखांवर पोहोचली असून ती वसूल करण्याकरीता प्रशासनाने काय पावले उचलली आहेत, अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली. त्यावर प्रशासनाला योग्य खुलासा करता आला नाही. मिळकतधारक घरफाळा लावा म्हणून येतात; पण त्यांना घरफाळा लावला जात नाही, अशी तक्रार करीत जोपर्यंत तुमची यंत्रणा सुधारत नाही तोपर्यंत घरफाळा वाढ होऊ देणार नाही, असा इशाराही ठाणेकर यांनी दिला. भांडवली मूल्यावर घरफाळा लावण्याची पद्धत अंमलात आणताना सभागृहाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. शहरातील अनेक लॉज, हॉटेल्स, यात्री निवास यांना योग्य घरफाळा लावल्यास कोट्यवधींचे उत्पन्न वाढू शकेल, याकडे भूपाल शेटेंनी लक्ष वेधले. वसुलीची मोहीम व्यापक करावी, अशी मागणीही त्यांनी केली. चर्चेत वहिदा सौदागर, प्रवीण केसरकर, रूपाराणी निकम, सूरमंजिरी लाटकर, पूजा नाईकनवरे, शारंगधर देशमुख यांनी भाग घेत घरफाळा वाढीला तीव्र विरोध केला. (प्रतिनिधी) साडेचार तासानंतर सभा तहकूबसोमवारी महापालिकेची सभा सुमारे साडेचार तास चालली; परंतु त्यामध्ये घरफाळा, पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावावर निर्णय न घेता ते प्रलंबित ठेवण्यात आले. उलट नगरसेवकांनी प्रशासनावर तोंडसुख घेतले. शेवटी सभा तहकूब करून निर्णय प्रलंबित ठेवला. घरफाळा विभागाचे प्रमुख दिवाकर कारंडे यांनी सभेत नोंदविले गेलेले आक्षेप खोडून काढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. प्रशासन काटेकोरपणे वसुली करीत असले तरी न्यायालयातील प्रकरणामुळे वसुलीवर परिणाम झाल्याचे त्यांनी मान्य केले. शुक्रवारी पुन्हा बैठक करवाढीच्या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी महापौर फरास यांनी सर्व पदाधिकारी, गटनेते, अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक शुक्रवारी आयोजित केली आहे. या सभेत घरफाळा व पाणीपट्टी वाढीचे पर्यायी दोन, तीन प्रस्ताव सुचवावेत, त्यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे शारंगधर देशमुख यांनी सांगितले.थक्क करणारी थकबाकी१ हजार ते १० हजारांपर्यंतची ११.५९ कोटी, दहा हजार ते एक लाखापर्यंतची २८.२७ कोटी, एक लाख ते पाच लाखांपर्यंत १७.७१ कोटी, पाच लाख ते दहा लाखांपर्यंतची ५.९९ कोटी, दहा लाखांच्यावरील ९.५३ कोटींची थकबाकी असल्याची माहिती देऊन ती वसूल केली जात नाही, अशी माहिती नगरसेवक अजित ठाणेकर यांनी सांगितली.