शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नागपूर-रत्नागिरी महामार्गावर दानेवाडीसोबत कुशिरे, केर्ली गावाजवळ उड्डाणपुलाचा प्रस्ताव

By संदीप आडनाईक | Updated: January 8, 2025 15:19 IST

आंदोलनाच्या रेट्याला यश : महामार्ग प्राधिकरणाकडून हलली सुत्रे

संदीप आडनाईककोल्हापूर : नियोजित नागपूर-रत्नागिरी १६६ या महामार्गावर पन्हाळा तालुक्यातील कुशिरे आणि करवीर तालुक्यातील निगवे दुमाला या गावांच्या हद्दीत प्रमुख जिल्हा मार्ग १२ वर क्रॉसरोडवर उड्डाणपूल बांधावा, या मागणीसाठी निगवे-कुशिरे उड्डाणपूल कृती समितीने रविवारी कुशिरे महामार्गाच्या कामाच्या ठिकाणी जनआंदोलन केल्यानंतर याठिकाणी, तसेच केर्ली रोडवरही उड्डाणपुलाचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. पंचक्रोशीतील लोकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित कंपनीविरोधात निदर्शने केल्यानंतर अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.  तसेच बोरपाडळे गावाजवळ दानेवाडी येथेही उड्डाणपुलाचा प्रस्ताव आहे.

दरम्यान, आंदोलनानंतर सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गाचे उपअभियंता गोविंद बैरवा यांच्याशी चर्चा केली. या मार्गावर उड्डाणपूल करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे.जोतिबा यात्रेकरूंसाठी केर्लीजवळही उड्डाणपूलदरम्यान, रत्नागिरी ते नागपूर एक्सप्रेस महामार्ग क्रमांक १६६ केर्ली ते वाडी रत्नागिरी, म्हणजेच श्रीक्षेत्र जोतिबा रस्त्यामधून जाणार आहे. कोल्हापूरहून येणाऱ्या भाविकांच्या गाड्या या केर्ली येथून श्री क्षेत्र जोतिबा डाेंगरावर दर्शनासाठी येत असल्यामुळे याठिकाणी वाहनांची सातत्याने मोठी वर्दळ असते. चैत्र यात्रा श्रावण षष्ठी यात्रा दर रविवारी, तसेच पौर्णिमादिवशी लाखो भाविक याच रस्त्याने येतात आणि जातात. त्यामुळे त्यांच्या जीवितालाही मोठा धोक पोहचणार आहे. त्यामुळे कोतमीरे मळ्याजवळ उड्डाणपुलाचा प्रस्ताव आहे.विद्यार्थ्यांसाठीही सोयीचाकेर्ली, कुशिरे, रजपूतवाडी, सोनतळी, निगवे, केर्ले, पडवळवाडी, वडणगे, जोतिबा या परिसरातील हजारा विद्यार्थी या मार्गावरील शैक्षणिक संस्थेत शिकण्यासाठी येत असतात. शाळेपासून हा महामार्ग अवघ्या ५०० मीटरवर आह, त्यामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे. पुलाची आवश्यकता असल्याचे या गावच्या ग्रामस्थांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्ग