शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
4
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
5
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
6
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
7
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
9
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
10
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
11
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
12
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
13
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
14
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
15
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
16
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
17
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
18
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
19
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
20
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण

Maharashtra Vidhan Sabha 2019 : कुटुंबीयांच्या हातात प्रचाराची धुरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2019 12:13 IST

उमेदवारीची अधिकृत माळ अजून गळ्यात पडली नसली तरी ‘भावी आमदार’ समजून इच्छुक उमेदवारांच्या कुटुंबीयांनीच प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतल्याचे चित्र जिल्ह्यातील मतदारसंघांत दिसत आहे.

ठळक मुद्देकुटुंबीयांच्या हातात प्रचाराची धुरा, जोडण्या लावण्यात सहभागमहत्त्वाच्या व्यवहारांची घरच्या मंडळींवरच धुरा

नसिम सनदीकोल्हापूर : उमेदवारीची अधिकृत माळ अजून गळ्यात पडली नसली तरी ‘भावी आमदार’ समजून इच्छुक उमेदवारांच्या कुटुंबीयांनीच प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतल्याचे चित्र जिल्ह्यातील मतदारसंघांत दिसत आहे.

कुटुंबातील प्रत्येक सदस्य जबाबदाऱ्याही वाटून घेत गावोगावी जाऊन प्रचाराची राळ उडवत आहेत. त्यात कागलमधून मुश्रीफ, घाटगे, ‘कोल्हापूर दक्षिण’मधून पाटील, महाडिक, ‘कोल्हापूर उत्तर’मधून क्षीरसागर, करवीरमधून नरके, पाटील, इचलकरंजीतून आवाडे या घराण्यांतील कुटुंबीयांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे. सगळीकडेच उमेदवाराला जाणे शक्य होत नाही तिथे कुटुंबातील सदस्य लोकांना भेटून प्रचाराची भरपाई करत आहेत.आधी निवडणुका म्हटल्या की कुटुंबीयांनी घर सांभाळायचे आणि विश्वासातील कार्यकर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळायची, असे समीकरणच होते; पण कालौघात नेता आणि कार्यकर्ता यांच्यात पूर्वीसारखा विश्वास राहिलेला नाही. मतदानासाठी देवघेवीचे व्यवहार वाढल्यापासून जवळच्या कार्यकर्त्यांकडून विश्वासघात होण्याच्या अनेक घटना राजकीय पटलावर गाजल्या.

हा धडा समजून प्रत्येक उमेदवाराने आपापले कुटुंब हा हुकमी एक्का बाहेर काढण्याचे ठरविले. साधारणपणे सन २०१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून या बदलाला सुरुवात झाल्याचे दिसते. खासकरून ज्या राजकीय घरातील महिला हळदी-कुंकू आणि एखाद-दुसरी प्रचाराची फेरी वगळता कधी बाहेर पडायच्या नाहीत, त्यादेखील सक्रियपणे प्रचारात उतरल्या.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या घरातील महिला थेट व्यासपीठावरच दिसल्या. एकूण मतदानाच्या ५० टक्के महिला मतदार असल्याने त्यांना आपलेसे करण्याची जबाबदारी या महिलांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. त्यात आई, पत्नी, सून, मुलगी, भावजय, वहिनी या नात्यांनी अनेकजणींनी प्रचारात उडी घेतली आहे.

घरच्या महिलांनी पदर खोचून प्रचार रिंगणात उतरल्यानंतर उमेदवाराच्या घरातील वडील, भाऊ, मुले, पुतणे, चुलते यांनीही प्रचाराची मुख्य धुरा हातात घेतली आहे. आर्थिक व्यवहारापासून ते उमेदवारांच्या आरोग्याची देखभाल करण्यापर्यंतची पडद्यामागील सर्व जबाबदारी यांच्यावर आहे. पडद्यासमोर आणि पडद्यामागील अशा दोन्ही यंत्रणा रात्रं-दिवस राबविण्यासाठी हे सर्व कुटुंबीय राबत आहेत. त्यांना विश्वासातील कार्यकर्त्यांचीही मदत होत आहे.उमेदवारांसाठी राबणारे कुटुंबीय

  • कोल्हापूर उत्तर

आमदार राजेश क्षीरसागर- पत्नी वैशाली, मुलगा ऋतुराज व पुष्कराजचंद्रकांत जाधव - पत्नी जयश्री जाधव, भाऊ संभाजी जाधव

-------------------------------------

  • कोल्हापूर दक्षिण

आमदार अमल महाडिक - पत्नी शौमिका, चुलतबंधू धनंजय महाडिक, भावजय अरुंधती महाडिकऋतुराज पाटील - वडील संजय पाटील, चुलते सतेज पाटील, चुलती प्रतिमा पाटील----------------------------------------

  • कागल

आमदार हसन मुश्रीफ - पत्नी सायरा, मुलगा, नविद, आबिद, साजिद, सुना अमरिन, नबिलासमरजित घाटगे- पत्नी नवोदिता, आई सुहासिनीदेवी, चुलते प्रवीणसिंह, चुलतभाऊ वीरेंद्र------------------------------------

  • करवीर

आमदार चंद्रदीप नरके - चुलते अरुण नरके, भाऊ अजित नरकेपी. एन. पाटील - मुलगा राहुल व राजेश पाटील------------------------------------

  • इचलकरंजी

प्रकाश आवाडे- वडील कल्लाप्पाण्णा, मुलगा राहुल, पत्नी किशोरी आणि सुना-------------------------------------

  • राधानगरी

आमदार प्रकाश आबिटकर - बंधू अर्जुन आबिटकर, भावजय रोहिणी आबिटकरराहुल देसाई - वडील बजरंग देसाई, पत्नी रेश्मा देसाई, बंधू धैर्यशील देसाई-------------------------------------------

  • शाहूवाडी :

विनय कोरे : पत्नी शुभलक्ष्मी कोरे, भाऊ निपुण कोरे, पुतणे विश्वेश कोरे, भावजय नेहा कोरेआमदार सत्यजित पाटील : वडील बाबासाहेब पाटील, भाऊ राहुल पाटील.------------------------------------

  • हातकणंगले :

राजूबाबा आवळे : वडील जयवंतराव आवळे, भाऊ संजय आवळेआमदार सुजित मिणचेकर : पत्नी लेखा मिणचेकर, दोन भाऊ 

 

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाkolhapurकोल्हापूर