शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

अभयारण्यकडील प्रश्न तातडीने सोडवू :क्लेमेंट बेन, प्रकल्पग्रस्तांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 18:45 IST

forest department Kolhapur- अभयारण्यकडील प्रश्न महिन्यातून २ बैठका घेऊन आढावा घेऊ आणि प्रलंबित असलेल्या मुद्यांची तातडीने सोडवणूक करू असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक)  डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिले. 

ठळक मुद्देअभयारण्यकडील प्रश्न तातडीने सोडवू :क्लेमेंट बेनप्रकल्पग्रस्तांशी चर्चा

कोल्हापूर : अभयारण्यकडील प्रश्न महिन्यातून २ बैठका घेऊन आढावा घेऊ आणि प्रलंबित असलेल्या मुद्यांची तातडीने सोडवणूक करू असे आश्वासन मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक)  डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिले. 

बेन यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या कार्यालयात श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बेन यांनी आश्वासन दिले. यावेळी बेन यांनी प्रकल्पग्रस्तांशी चर्चा केली. या बैठकीस कोल्हापूर प्रादेशिकचे उपवनसंरक्षक आर. आर. काळे, विभागीय वन अधिकारी ( वन्यजीव) विशाल माळीविभागीय वन अधिकारी (दक्षता व नियोजन) एस.डी. गवते, सहाय्यक वनसंरक्षक एस. डी. निकम, पुनर्वसनचे  तहसिलदार वैभव पिलारे, श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष मारुती पाटील, शंकर पाटील, सुरेश पाटील, श्यामराव कोठारी, आकाराम झोरे, श्यामराव पाटील, कोंडीबा पवार , राजाराम शेलार  उपस्थित होते.या मुद्द्यावर चर्चा १) २१५ हेक्टर वन जमिनीची निर्वनीकरनाची अंतिम मंजुरी तातडीने घेण्याचे ठरले.२) आंदोलकांनी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांना दिलेल्या दोन पत्राप्रमाणे, आम्हाला अभयारण्यातून उठऊन बाहेर काढले, तेव्हापासून आतापर्यंत किती जंगल वाढले, आणि किती प्राणी वाढले आणि प्राणी का बाहेर येतात यासाठी दिलेल्या निवेदनाप्रमाणे कार्यकर्त्यांना घेऊन लवकरच दाखविण्याचे मान्य केले.३) अजूनही वन विभागाची कसणुकीलायक असलेल्या जमिनी १० दिवसात प्रकल्पग्रस्तांना दाखवून पसंत्या घेणे, आणि ३० दिवसात याचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे ठरले.४) निर्वाहभत्ता, ६५ टक्के रक्कमेवरील व्याज, घरबांधणी अनुदान, शौचालय अनुदान इत्यादीसाठी १९ कोटी उपलब्ध झाले आहेत, ते तातडीने वाटण्याचे ठरले.५) प्रकल्पग्रस्तांच्या गावठाणात पिण्याचे पाणी व अपूर्ण असलेल्या नागरी सुविधा यांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी कार्यकारी अभियंता वारणा कालवे विभाग यांना तातडीने पत्र देण्याचे ठरले.६) सोनार्लीच्या मूळ गावात असलेल्या जमिनी परस्पर फॉरेस्टकडे वर्ग झाल्या आहेत, त्याचा प्रस्ताव तयार करून प्रकल्पग्रस्तांना त्याचा मोबदला तातडीने देण्याचे ठरले.७) प्रकल्पग्रस्तांच्या गावोगावी जनवन कमिट्या लवकरात लवकर स्थापन करण्याचा कार्यक्रम घेण्याचे ठरले.८) पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आम्हाला आवड आणि माहिती असल्यामुळे आम्ही बिन पगाराचे नियोजन करण्यास तयार आहे असे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने मारुती पाटील यांनी सांगितले.

महिन्यातून १ ते २ बैठका घेऊन आढावा घेऊ आणि प्रलंबित असलेल्या मुद्यांची सोडवणूक करू असे आश्वासन डॉ. व्ही. क्लेमेंट बेन यांनी दिले. या मुद्द्यांची चर्चा होऊन कालबद्ध कार्यक्रम ठरला. यामुळे प्रकल्पग्रस्तांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. परंतु अशा बैठका होतात, कालबद्धता ठरते, परंतु त्याची सोडवणूक करण्याचे वर्षांनुवर्षे प्रलंबित राहते, याचा अनुभव पाहता त्याची सोडवणूक होईपर्यंत आणि ठरल्याप्रमाणे कार्यक्रम सुरू होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनस्थळी केला आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागkolhapurकोल्हापूर