शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांचे तोंडाला काळ्या फिती लावून मूक - कोल्हापूर  आंदोलन आठव्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 14:04 IST

उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या आंदोलनाची दखल न घेता मौन धारण केले आहे.

ठळक मुद्दे दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ तोंडाला कापडाच्या काळ्या पट्ट्या लावून मूक धरणे आंदोलनसरकारने मौन सोडून बोलते व्हावे, असे आवाहन आंदोलनात सहभागी झालेल्या प्राध्यापकांनी सरकारला केले

कोल्हापूर : उच्च शिक्षणातील शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून राज्यातील प्राध्यापकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी या आंदोलनाची दखल न घेता मौन धारण केले आहे. मुख्यमंत्र्यांचे मौन सुटावे यासाठी मंगळवारी गांधीजयंतीदिनी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) तर्फे मंगळवारी दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याजवळ तोंडाला कापडाच्या काळ्या पट्ट्या लावून मूक धरणे आंदोलन करण्यात आले.

रिक्त जागा भरण्यात याव्यात, जुनी पेन्शन योजना लागू करावी, विद्यापीठातील शासननियुक्त नामनिर्देशन कमी करावे, प्राध्यापकांचे ७१ दिवसांचे थकीत वेतन अदा करावे, या प्रमुख मागण्यांसाठी प्राध्यापकांचे ‘एम्फुक्टो’ या राज्यव्यापी संस्थेच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने या आंदोलनात सहभाग घेतला असून, गेल्या आठ दिवसांत विविध प्रकारे हे आंदोलन केले जात आहे.

मंगळवारी महात्मा गांधी जयंतीदिनी मुख्यमंत्र्यांचे मौन सुटावे, यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सरकारने मौन सोडून बोलते व्हावे, असे आवाहन आंदोलनात सहभागी झालेल्या प्राध्यापकांनी सरकारला केले. यावेळी मौन आंदोलनामध्ये ज्येष्ठ नेते प्रा. सुधाकर मानकर, डॉ. सुभाष जाधव, डॉ. डी. एन. पाटील, डॉ. अरुण शिंदे, डॉ. अरुण पाटील, प्रा. संतोष जेठीथोर, प्रा. आर. जी. कोरबू, प्रा. प्रकाश कुंभार यांच्यासह प्राध्यापक उपस्थित होते.यांनी दिला पाठिंबाआंदोलनस्थळी आमदार चंद्रदीप नरके यांनी आंदोलनास भेट देऊन मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीचे नेते सुधाकर सावंत, प्रभाकर आरडे, ‘आयटक’चे बी. एल. बरगे, माध्यमिक शिक्षक संघ व लोकशाही आघाडीचे राजेश वरक, आदींनी भेटून आंदोलनास पाठिंबा दिला. 

टॅग्स :Professorप्राध्यापकkolhapurकोल्हापूर