शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:57 IST

राज्यातील प्राध्यापकांची २९०० रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. लवकरच ती भरती प्रक्रिया राबविली जाईल तसेच शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटींचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत जाहीर केले.

ठळक मुद्देप्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच मंत्री उदय सामंत यांची विद्यापीठात बैठक

कोल्हापूर : राज्यातील प्राध्यापकांची २९०० रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. लवकरच ती भरती प्रक्रिया राबविली जाईल तसेच शिवाजी विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासनासाठी एक कोटींचा निधी लवकरच वितरित करण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत जाहीर केले. शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या सभागृहात शनिवारी मंत्री सामंत यांनी शिवाजी विद्यापीठातील कामकाजासंबंधी आढावा बैठक घेतली.मंत्री सामंत म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील अनेक प्रश्न मंत्रालयात प्रलंबित आहेत, ते प्रश्न सोडविण्यासाठी मुंबईतील मंत्रालयातील कामाचा पाठपुरावा करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने कायमस्वरूपी एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी. त्यामुळे विद्यापीठ व शासनामध्ये समन्वय निर्माण होईल.शिवाजी विद्यापीठ हे राज्यातील एक अग्रणी विद्यापीठ असून येथील फॅकल्टी डेव्हलपमेंट सेंटर फॉर सायबर सिक्युरिटी अ‍ॅन्ड डाटा सायन्सेसचे राष्ट्रीय संस्थेत रूपांतर करण्याच्या दृष्टीने विद्यापीठाने सर्वसमावेशक स्वरूपाचा प्रस्ताव सादर करावा. विद्यापीठामधील विविध प्रकल्पांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून पाच वर्षांच्या कालावधीत साधारणत: दहा कोटींच्या निधीची तरतूद करता येईल का, यादृष्टीनेही विचार करावा, अशी सूचनाही दिल्या.यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलगुरू डॉ. शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठाविषयी पॉवर पॉर्इंट सादरीकरण केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.

बैठकीला आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण संचालक डॉ. धनराज माने, कोल्हापूरचे विभागीय सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, अधिष्ठाता डॉ. पी. डी. राऊत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ.भारती पाटील, डॉ. ए. एम. गुरव आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते. 

 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर