शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

फार्मसीच्या पेपरला ॲटो लॉगआऊटची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2020 11:41 IST

shivaji university, educationsector, exam, kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत बुधवारी बी. फार्मसी. (औषध निर्माणशास्त्र) अभ्यासक्रमाच्या पेपरच्या शेवटच्या दहा मिनिटांमध्ये काही विद्यार्थ्यांना ॲटो लॉगआऊटच्या तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. ही समस्या समजताच विद्यापीठाने ही अडचण दूर केली आणि परीक्षार्थींना वेळ वाढवून दिली.

ठळक मुद्देअंतिम वर्षाच्या परीक्षेतील प्रकार शिवाजी विद्यापीठाने परीक्षार्थींनी दिली वेळ वाढवून

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेत बुधवारी बी. फार्मसी. (औषध निर्माणशास्त्र) अभ्यासक्रमाच्या पेपरच्या शेवटच्या दहा मिनिटांमध्ये काही विद्यार्थ्यांना ॲटो लॉगआऊटच्या तांत्रिक समस्येला सामोरे जावे लागले. ही समस्या समजताच विद्यापीठाने ही अडचण दूर केली आणि परीक्षार्थींना वेळ वाढवून दिली.विद्यापीठाने अंतिम सत्र, वर्षाच्या परीक्षांची सुरुवात मंगळवारपासून झाली. बी. फार्मसी सत्र आठमधील फार्मास्युटिकल्स ज्युरिसप्रोडन्सी या विषयाचा पेपर बुधवारी दुपारी दीड ते अडीच या वेळेत होता. ऑनलाईन पद्धतीने पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यांना शेवटच्या दहा मिनिटांमध्ये ॲटो लॉगआऊट या तांत्रिक समस्येला तोंड द्यावे लागले. अचानकपणे ही समस्या निर्माण झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

काही विद्यार्थ्यांनी त्याबाबतची माहिती विद्यापीठाला कळविली. त्यानंतर विद्यापीठाने तातडीने कार्यवाही करत ही समस्या दूर केली. दरम्यान, या समस्येबाबतचे माहिती देणारे दूरध्वनी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास आले. त्यावर ही तांत्रिक समस्या तातडीने दूर केली. विद्यार्थ्यांना वेळ वाढवून दिली, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी दिली.दुसऱ्या दिवशी ११६५७ जणांची परीक्षाबुधवारच्या पहिल्या सत्रात बी. ई. एमएसडब्ल्यू., एमआरएस., बी. व्होक, एमबीए (रूरल मॅनेजमेंट) , तर दुसऱ्या सत्रात बी. फार्मसी, बी. टेक आणि तिसऱ्या सत्रात बी. टेक्सटाईल बॅचलर ऑफ ड्रेस मेकिंग ॲन्ड फॅशन को-ऑर्डिनेशन, बॅचलर ऑफ डिझाईन, बी. लिब., एम. लिब., बीजेसी., बी. आर्किटेक्चर, बी. व्होक या अभ्यासक्रमांच्या परीक्षा झाल्या. ११,५२१ विद्यार्थ्यापैकी ११,५०० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा दिली. २०० विद्यार्थ्यापैकी १५७ विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा दिली.विद्यापीठाकडून दक्षताकोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात येत असून विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन परीक्षा मंडळाने केले आहे.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठexamपरीक्षाEducation Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर