शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

'अंनिस'मुळे टळली नववधूची कौमार्य चाचणी, कोल्हापुरात समोर आला धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 11:30 IST

यापूर्वी ज्या मुला-मुलींनी यासाठी नकार दिला, त्यांना सामाजिक विरोधाला सामोरे जावे लागले होते.

कोल्हापूर : शिरोली परिसरातील एका विवाह समारंभानंतर गुरुवारी नववधूची होणारी संभाव्य कौमार्य चाचणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हस्तक्षेपामुळे टळली. अंनिसच्या तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी हॉल मालक, वधू-वर व त्यांच्या पालकांना नोटीस पाठवून त्यांचा जबाब घेतला. या वेळी त्यांनी आम्ही असा कोणताही प्रकार करणार नसल्याचे सांगितले. कौमार्य चाचणीसाठी सक्ती केली जात असल्यास तरुण-तरुणींनी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य सरचिटणीस कृष्णात स्वाती यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले, शिरोली परिसरातील एका हॉलमध्ये गुरुवारी एका समाजातील विवाह समारंभ होणार होता. विवाहानंतर तेथेच वधूची कौमार्य चाचणी केली जाणार होती, अशी तक्रार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे एकाने केली होती. समितीने शिरोली एमआयडीसीच्या पोलीस उपनिरीक्षकांना ही कौमार्य चाचणी रोखण्यात यावी अशी मागणी केली.त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र खांडवे, हवालदार आर. बी. कुंभार, नीलेश कांबळे यांनी हाॅल मालक, वधू-वर आणि त्यांच्या पालकांना नोटीस काढून याबाबत जबाब घेतला. या वेळी त्यांनी आम्ही अशी कोणतीही चाचणी करत नसल्याचे त्या कुटुंबीयांनी जबाबात सांगितले. ही चाचणी रोखण्यासाठी कृष्णा चांदगुडे, ॲड. रंजना गवांदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद शिंदे, रामदास देसाई, स्वाती कृष्णात, मुक्ता निशांत, राजवैभव शोभा, निशांत शिंदे यांनी प्रयत्न केले.

अंनिसकडे संपर्क साधा..

- समाजात असे विधी होत नाही असा दावा केला जातो, मात्र समितीकडे या समाजात आजही कौमार्य चाचणीची प्रथा असल्याचे पुरावे आहेत. यापूर्वी ज्या मुला-मुलींनी यासाठी नकार दिला, त्यांना सामाजिक विरोधाला सामोरे जावे लागले होते. अलिकडेच नाशिकमधील एका उच्च शिक्षीत मुलीची चाचणीदेखील अंनिसने रोखली होती.- या प्रथेचा आग्रह धरणारे पंच व प्रतिनिधी उघडपणे त्याचे समर्थन करत नाहीत. उलट विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर सामाजाच्या बदनामीचे आरोप करतात. आपल्यावर अशी सक्ती होत असल्यास तरुण तरुणींनी समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन अंनिसने केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर