शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

खासगी विमा कंपन्यांकडून सर्व्हेचा कायदा पायदळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 4:37 PM

भारतीय विमा नियंत्रक आणि विकास प्राधिकरणांतर्गत इन्श्यूरन्स अ‍ॅक्ट २0१५ अंतर्गत वाहनधारकांचे ५0 हजारांपुढील नुकसानीचे सर्व्हे परवानाधारक स्वतंत्र सर्व्हेअर्सकडून करणे बंधनकारक आहे, तथापि खासगी विमा कंपन्यांकडून हा कायदा पायदळी तुडवला जात आहे. अशिक्षित व अपात्र कर्मचाऱ्यांकडून सर्व्हे करून घेतला जात असल्यामुळे कंपन्यांचा फायदा होत असला, तरी वाहनधारकांचे मात्र नुकसान होत आहे, या बाबीकडे कोल्हापुरातील इन्श्यूरन्स सर्व्हेअर्स युनिटने लक्ष वेधले.

ठळक मुद्देखासगी विमा कंपन्यांकडून सर्व्हेचा कायदा पायदळीइन्श्यूरन्स सर्व्हेअर्स कोल्हापूर युनिटची माहिती : वाहनधारकांचे नुकसान

कोल्हापूर : भारतीय विमा नियंत्रक आणि विकास प्राधिकरणांतर्गत इन्श्यूरन्स अ‍ॅक्ट २0१५ अंतर्गत वाहनधारकांचे ५0 हजारांपुढील नुकसानीचे सर्व्हे परवानाधारक स्वतंत्र सर्व्हेअर्सकडून करणे बंधनकारक आहे, तथापि खासगी विमा कंपन्यांकडून हा कायदा पायदळी तुडवला जात आहे.

अशिक्षित व अपात्र कर्मचाऱ्यांकडून सर्व्हे करून घेतला जात असल्यामुळे कंपन्यांचा फायदा होत असला, तरी वाहनधारकांचे मात्र नुकसान होत आहे, या बाबीकडे कोल्हापुरातील इन्श्यूरन्स सर्व्हेअर्स युनिटने लक्ष वेधले.या युनिटचे समन्वयक दुर्गादास बसरूर, उपसमन्वयक सतीश शहापूरकर, मनोज गुरव, विठ्ठल गावडे यांनी  कोल्हापुरात पत्रकार बैठक घेऊन ही वस्तूस्थिती समोर आणली.भारतीय विमा नियंत्रक आणि विकास प्राधिकरण या केंद्राच्या संस्थेमार्फत विमाधारकांना संरक्षण दिले जाते.

या नियमाचे सरकारी विमा कंपन्या काटेकोरपणे पालन करत आहेत; पण खासगी कंपन्या मात्र सर्व नियम धाब्यावर बसवित असल्याचे दिसत आहे. खासगी कंपन्यांकडून सर्व्हे होताना वाहनधारकांऐवजी कंपन्यांचे हित समोर ठेवले जात आहे, अशा ठिकाणी स्वतंत्र व तटस्थ सर्व्हेअर्सची आवश्यकता असते. जेणेकरून विमाधारकास योग्य न्याय मिळू शकेल, असे या प्रतिनिधींनी सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर