शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते उचलून भाजपने मिळविले यश : पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 12:04 IST

भाजपने माणसे फोडा हे धोरण अवलंबिले आहे. त्यातूनच सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते उचलून भाजपने यश मिळविले आहे; परंतु हे यश अल्पकाळ असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देसांगलीत काँग्रेसचे कार्यकर्ते उचलून भाजपने मिळविले यश : पृथ्वीराज चव्हाण यांचा टोलालोकसभा निवडणूक जानेवारी-फेब्रुवारीत

कोल्हापूर : भाजपने माणसे फोडा हे धोरण अवलंबिले आहे. त्यातूनच सांगली महापालिकेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते उचलून भाजपने यश मिळविले आहे; परंतु हे यश अल्पकाळ असल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका या जानेवारी-फेब्रुवारीत होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.चव्हाण म्हणाले, भाजपने सुरुवातीपासूनच माणसे फोडून आपला पक्ष विस्ताराचे धोरण अवलंबिले आहे. सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने पैशाचा वारेमाप वापर केला. तसेच कॉँग्रेसचे कार्यकर्ते उचलून त्यांना भाजपची उमेद्वारी देऊन यश संपादन केले; परंतु हे यश दिर्घकालीन नसून ते अल्पकाळ टीकणार आहे.

शेवटी पराभव हा पराभवच आहे; त्यामुळे कॉँग्रेसच्या पराभवाबाबत तेथील नेत्यांशी आज, उद्या भेट घेऊन चर्चा केली जाईल. यापूर्वी कोणी इव्हीएम मशिनवर चर्चा केली नाही; परंतु आताच या विरोधात आक्रोश होत आहे. हे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.ते पुढे म्हणाले, लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र लढल्यास खर्च कमी होईल, ही भाजप सरकारची भूमिका अयोग्य आहे. आगामी राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या विधानसभा निवडणुकांमध्ये चांगले यश मिळणार नाही, हे लक्षात आल्याने भाजप सरकार या निवडणुका एकत्रित घेण्याची भाषा बोलत आहे. लोकसभा निवडणूक ही डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता कमी असून ती जानेवारी-फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. 

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणkolhapurकोल्हापूर