कोल्हापूर : ‘लोकमत’चे संस्थापक व स्वातंत्र्यसंग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा यांच्या जयंती दिनानिमित्त बिंदू चौकातील कोल्हापूर जिल्हा कारागृह (सबजेल)मध्ये शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला.
‘लोकमत रक्ताचं नातं’ याअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर झाले. स्वत: अधीक्षक झेंडे यांच्यासह सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या कर्मचाऱ्यांनी कर्तव्याबरोबरच आपली सामाजिक बांधिलकी जपली. यावेळी तुरुंग अधिकारी जयवंत भोसले, सुभेदार प्रल्हाद पाटील, कर्मचारी शशिकांत जाधव, भास्कर जाधव, महेश गडनाईक, शिवाजी शिंदे आदी उपस्थित होते. शिबिरात रक्त संकलन वैभवीलक्ष्मी ब्लड बँकेतर्फे करण्यात आले. ‘लोकमत’तर्फे सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
फोटो : १००७२०२१-कोल- बिंदू चौक सबजेल०१
ओळी : कोल्हापुरातील बिंदू चौक जिल्हा कारागृह (सबजेल)मध्ये शनिवारी ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत अधीक्षक विवेक झेंडे उपस्थित होते.
फोटो : १००७२०२१-कोल- बिंदू चौक सबजेल०२
ओळी : कोल्हापुरातील बिंदू चौक जिल्हा कारागृह (सबजेल) मध्ये शनिवारी ‘लोकमत’तर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात सहभागी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत अधीक्षक विवेक झेंडे उपस्थित होते.