शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अडचणींवर मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांच्या पूर्नवसनाला प्राधान्य :मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 18:17 IST

Hasan Mushrif Dam Collcator Kolhapur- आंबेओहोळ धरणग्रस्तांपैकी ३८९ जणांचे पूर्नवसन आणि ५० कोटींचे वाटप झाले आहे. ३३ हेक्टर जमिनींवर आयुक्तांची स्थगिती असून ती उठवण्यात येईल. त्याशिवाय अजून १६ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. गडहिंग्लज, बेकनाळ येथील भूसंपादन, नागरिकांच्या वैयक्तीक, कौटूंबिक व न्यायालयीन अडचणी आहेत, त्यावर पर्याय काढून प्रकल्पग्रस्तांचे पूर्नवसन करण्यास प्राधान्य देवू असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिले.

ठळक मुद्देअडचणींवर मार्ग काढून प्रकल्पग्रस्तांच्या पूर्नवसनाला प्राधान्य :मुश्रीफमंत्री हसन मुश्रीफ यांची आंबेओहोळप्रश्र्नी सकारात्मक चर्चा

कोल्हापूर : आंबेओहोळ धरणग्रस्तांपैकी ३८९ जणांचे पूर्नवसन आणि ५० कोटींचे वाटप झाले आहे. ३३ हेक्टर जमिनींवर आयुक्तांची स्थगिती असून ती उठवण्यात येईल. त्याशिवाय अजून १६ हेक्टर जमीन उपलब्ध आहे. गडहिंग्लज, बेकनाळ येथील भूसंपादन, नागरिकांच्या वैयक्तीक, कौटूंबिक व न्यायालयीन अडचणी आहेत, त्यावर पर्याय काढून प्रकल्पग्रस्तांचे पूर्नवसन करण्यास प्राधान्य देवू असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी दिले.आंबेओहोळ धरणाच्या घळभरणीचे काम सुरु असून पूर्नवसन झाल्याशिवाय घळभरणी करु देणार नाही अशी भूमिका नागरिकांनी घेतली होती, या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, गडहिंग्लजच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, पूर्नवसन अधिकारी अश्विनी जिरंगे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन, भुसंपादन अधिकारी हेमंत निकम उपस्थित होते. यावेळी ४४ अर्जांवर चर्चा होवून काही अर्ज निकाली काढण्यात आले.मंत्री मुश्रीफ म्हणाले, चिकोत्रा धरणग्रस्तांचे पूर्नवसन झाले. आता आंबेओहोळच्या नागरिकांचे वैयक्तिक, कौटूंबिक अडचणी आहेत, तांत्रिक मुद्दे आहेत, शासकीय नियमावली आहे, काही न्यायालयीन प्रकरणे आहेत त्या सगळ्यांवर पर्याय काढून शेवटच्या प्रकल्पग्रस्ताचे पूर्नवसन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही.प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी प्रकरणाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. आंबेओहोळ प्रकल्पग्रस्तांसाठी बुधवारचा दिवस राखीव ठेवला आहे. यादिवशी नागरिकांनी आपले अर्ज व त्यासंबंधीची कागदपत्रे घेवून यावे, त्या प्रश्नावर समक्ष चर्चा करुन त्यावर निर्णय घेतले जातील असे सांगितले.श्रमिक मुक्ती दलाचे संपत देसाई म्हणाले, पूर्नवसन-संपादनाच्या संकलन यादीत प्रकल्पग्रस्ताच्या कुटूंबातील सूना, नातवंडे यांना ग्राह्य धरण्यात आलेले नाही. त्यांचाही समावेश करण्यात यावा, ६५ टक्के रक्कम भरुन पर्यायी जमीन उपलब्ध करुन देण्यात यावी, संकलन दुरुस्ती हे विषय मार्गी लागावेत.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य उमेश आपटे, संजय तरडेकर, शंकर पावले, बजरंग पुंडपळ, सचिन पावले यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :DamधरणHasan Mushrifहसन मुश्रीफcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर