कागल : केंद्र सरकारने जाहीर केलेले नवे शैक्षणिक धोरण सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे. सध्याची शिक्षण पद्धती आणि नवीन धोरणात मोठा बदल आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक क्षमता आणि अंगभूत कला विकसित करणारे नवे शैक्षणिक धोरण आहे, असे प्रतिपादन वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे फार्मसीचे प्राचार्य डाॅ. जाॅन डिसोझा यांनी केले.
येथील वाय. डी. माने एज्युकेशन कॅम्पसमध्ये आयोजित नवे शैक्षणिक धोरण २०२० या चर्चासत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भय्या माने होते. सुनील माने, बिपीन माने प्रमुख उपस्थितीत होते. भय्या माने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. संगीता बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले, तर अश्विनी हेरेकर यांनी आभार मानले. यावेळी संस्थेच्या डीन डाॅ. शिल्पा पाटील, प्राचार्या शुभांगी पवार, एस. एस. संकपाळ, श्रीमती लकडे, सचिन माळी, कोमल धनवडे, आदी उपस्थित होते.
फोटो कॅपशन
कागल येथे आयोजित शैक्षणिक चर्चासत्रात डाॅ. जाॅन डिसोझा यांचा भय्या माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.