माणगाववाडी येथे गावठी हातभट्टीवर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:26 AM2021-05-18T04:26:23+5:302021-05-18T04:26:23+5:30

गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी माणगाववाडी पश्चिम महाराष्ट्र, सीमा भाग कर्नाटकात प्रसिद्ध आहे. अनेक वेळा पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क ...

Print on village hand furnace at Mangaonwadi | माणगाववाडी येथे गावठी हातभट्टीवर छापा

माणगाववाडी येथे गावठी हातभट्टीवर छापा

Next

गावठी हातभट्टी दारू निर्मितीसाठी माणगाववाडी पश्चिम महाराष्ट्र, सीमा भाग कर्नाटकात प्रसिद्ध आहे. अनेक वेळा पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापे मारले तरीही न जुमानता हे दारू अड्डे अव्याहतपणे सुरूच आहेत. यामागे पोलिसांना दरमहा मिळणारा मलिदाही कारणीभूत असल्याची चर्चा आहे.

सध्या जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार बंद आहेत. माणगाववाडीतील हे दारू अड्डे राजरोसपणे सुरूच आहेत. याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वेंजणे, साहील झरकर, पोलीस उपनिरीक्षक कुरणे, पो. कॉ. संग्राम पाटील, अतुल निकम, सागर पोवार, संदीप कांबळे, चालक भूषण शेटे व अपर पोलीस अधीक्षक इचलकरंजी यांच्या आरसीपी फोर्स यांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी ११० बॅरेल कच्चे रसायन व सुमारे ६०० लिटर तयार दारू असा सहा लाख साठ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आला. पोलीस कारवाईची चाहूल लागताच भट्टी मालक पसार झाले.

Web Title: Print on village hand furnace at Mangaonwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.