शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबमध्ये मोदींच्या हत्त्येचा नियोजित कट असल्याचे उघड, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2022 18:51 IST

तसे झाले तर काय कारवाई करायची अशी विचारणाही केली होती. परंतू काहीही कारवाई करू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून हे उघडकीस आले आहे.

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी पंजाबच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मोदींच्या दौऱ्यात अडथळा येवू शकतो अशी पूर्वसुचना राज्याच्या पोलिस महासंचालकांना दिली होती. तसे झाले तर काय कारवाई करायची अशी विचारणाही केली होती. परंतू काहीही कारवाई करू नये असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. एका स्टिंग ऑपरेशनमधून हे उघडकीस आले आहे.त्यामुळे घडलेला प्रकार हा नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा नियोजित कट होता असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंजाब सरकारवर केला आहे. पाटील यांनी कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा गंभीर आरोप केला आहे. पाटील म्हणाले, पंतप्रधानांसारख्या महनीय व्यक्तिच्या दौऱ्यावेळी पर्यायी मार्ग तयार ठेवला जातो. ते तेथून जाणारच असे गृहित धरून बंदोबस्त ठेवण्यात येतो. हवामानातील बदलामुळे ते रस्ता मार्गाने जावू शकतात असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी २,३ आणि चार जानेवारीला स्पष्ट केले होते. परंतू त्याची राज्याच्या पोलिस महासंचालकांनी दखलच घेतली नाही. उलट असे झालेच तर कोणावरही कारवाई करू नका असेच स्पष्टपणे सांगितले होते. त्यामुळे आंदोलक आणि पोलिस अधिकारी एकत्र चहा पित असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे होते तसेच खलिस्तातनवादीही होते.या ठिकाणाहून पाकिस्तानची सीमा जमीनमार्गे केवळ दहा किलोमीटर तर हवाईमार्गे तीन किलोमीटर होते हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांच्यावर ड्रोननेही हल्ला होवू शकला असता. तरीही कॉग्रेसचे नेते या प्रकाराची खिल्ली उडवत आहेत हे चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीchandrakant patilचंद्रकांत पाटीलPunjabपंजाब